Earth End : याच शतकात पृथ्वीचा अंत; इतका भयानक की तुम्ही कल्पनाही केली नसेल

Last Updated:

याचा सर्वाधिक परिणाम अमेरिका, रशिया आणि चीनवर होईल, अशी भीती शास्त्रज्ञांना आहे. अशा घटना, कुठे आणि केव्हा घडतील हे सांगणं अशक्य आहे. इंडोनेशिया आणि अमेरिकेतल्या काही भागांचं बारकाईने निरीक्षण केलं जात आहे.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : एखाद्या महासाथीमुळे किंवा लघुग्रहाच्या धडकेमुळे पृथ्वीचा नाश होईल, अशी भीती शास्त्रज्ञांनी अनेकदा व्यक्त केलेली आहे; पण लघुग्रहांच्या धडकेच्या शक्यतेपेक्षा मोठ्या ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता जास्त आहे. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, की एका प्रचंड ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होईल. त्यासाठी मानव अजिबातच तयार नसेल. ही परिस्थिती या शतकातदेखील निर्माण होऊ शकते.
सीएनएनने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये असं म्हटलं आहे, की ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होईल, असं शास्त्रज्ञांना वाटतं. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, की पुढचा विनाशकारी ज्वालामुखी उद्रेक 1815मध्ये इंडोनेशियात झालेल्या 'माउंट तंबोरा'च्या उद्रेकापेक्षा अधिक धोकादायक असेल. तो आतापर्यंतचा सर्वांत भीषण ज्वालामुखी उद्रेक होता. त्यातून निघालेल्या धुळीच्या ढगांनी पृथ्वीचं तापमान कमालीचं कमी झालं होतं. त्या वर्षाला उन्हाळा नसलेलं वर्ष म्हटलं जातं. त्यामुळे जगभर पिकं नष्ट झाली, उपासमार झाली आणि कॉलरा महासाथ पसरली होती.
advertisement
जिनिव्हा युनिव्हर्सिटीतले हवामान तज्ज्ञ मार्कस स्टॉफेल यांनी आठवण करून दिली, की ज्वालामुखी नेहमी ग्रहावर परिणाम करतात; पण आता त्यांच्यामुळे हवामानबदलाचा नवा धोका निर्माण झाला आहे. 1991मध्ये झालेल्या पिनाटुबो ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर 15 दशलक्ष टन सल्फर डायऑक्साइड वातावरणाच्या स्ट्रॅटोस्फिअर या थरात पसरला होता. त्यामुळे पृथ्वीचं तापमान 0.5 अंश सेल्सिअसने कमी झालं होतं. तंबोरा उद्रेकानंतर पृथ्वीचं तापमान एक अंश सेल्सिअसने कमी झालं होतं.
advertisement
स्टॉफेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, वातावरणात गरम हवा वेगाने फिरते. त्यामुळे ज्वालामुखी उत्सर्जनातून बाहेर पडणारा सल्फर डायऑक्साइड अधिक प्रभावीपणे पसरण्यास मदत होईल आणि ग्रहाचं तापमान झपाट्याने कमी होईल. महासागरांचा उबदार पृष्ठभागदेखील वातावरण लवकर थंड करण्यात मदत करील. याशिवाय हवामानबदलामुळे ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यताही वाढणार आहे.
advertisement
लॉयडच्या विश्लेषणानुसार, तंबोरासारख्या उद्रेकामुळे 3.6 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच 3070 ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त नुकसान होऊ शकतं. याचा सर्वाधिक परिणाम अमेरिका, रशिया आणि चीनवर होईल, अशी भीती शास्त्रज्ञांना आहे. अशा घटना, कुठे आणि केव्हा घडतील हे सांगणं अशक्य आहे. इंडोनेशिया आणि अमेरिकेतल्या काही भागांचं बारकाईने निरीक्षण केलं जात आहे. तरीही तज्ज्ञ पुढच्या मोठ्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा अंदाज लावू शकत नाहीत.
मराठी बातम्या/Viral/
Earth End : याच शतकात पृथ्वीचा अंत; इतका भयानक की तुम्ही कल्पनाही केली नसेल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement