AI म्हणजे धोक्याची घंटा? पुढच्या 3 वर्षात 4,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार 'ही' बँक

Last Updated:

माणसाचे काम सोपे करण्यासाठी AI आता सक्षम होत आहे. याचा परिणाम म्हणून अनेक क्षेत्रात मोठे बदल पाहायला मिळत आहेत.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आजच्या युगात तंत्रज्ञानाची प्रगती झपाट्याने होत आहे. त्यातही विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI हे तंत्रज्ञान वेगाने बदल घडवत आहे. मानवाचे काम सोपे करण्यासाठी AI आता सक्षम होत आहे. याचा परिणाम म्हणून अनेक क्षेत्रात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. आश्चर्य म्हणजे माणसाचे काम सोपं करण्यापेक्षा आता ही टेक्नोलॉजी माणसांची जागा घेऊ लागली आहे.
असंच काहीसं एका बँकेत पाहायला मिळालं, या बँकेने आता पुढच्या 3 वर्षात आपल्या 4,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचं कारण आहे AI.
बँकेची अनेक कामे आता AI द्वारे सहज करता येतात, त्यामुळे मानवी कर्मचाऱ्यांची गरज कमी होत आहे. याचा फटका प्रामुख्याने तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना बसणार आहे. मात्र, कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या सुरक्षित राहतील असे बँकेने म्हटले आहे. नवनवीन प्रकल्प पूर्ण झाल्यावर आणि कर्मचाऱ्यांचे करार संपुष्टात आल्यावर त्यांच्या जागी नवीन भरती केली जाणार नाही असेही बँकेने स्पष्ट केले आहे.
advertisement
ही सिंगापूरची सर्वात मोठी बँक DBS आहे. पुढील 3 वर्षात आपल्या 4,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा या बँकेनं निर्णय घेतला आहे.
DBS चे CEO पीयूष गुप्ता यांनी सांगितले की, एकीकडे काही नोकऱ्या कमी होत असल्या तरी दुसरीकडे AI क्षेत्रात नवीन संधी निर्माण होत आहेत. DBS येत्या काळात AI संबंधित 1,000 नवीन नोकऱ्या निर्माण करेल. हा बदल स्वीकारणारी DBS ही पहिलीच मोठी बँक ठरली आहे. मात्र, या निर्णयाचा सिंगापूरमध्ये नेमक्या किती नोकऱ्यांवर परिणाम होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
advertisement
याच दरम्यान, AI च्या वाढत्या प्रभावामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने इशारा दिला आहे की, येत्या काळात AI मुळे जगभरातील 40% नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. IMF च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा म्हणाल्या की, 'AI मुळे आर्थिक असमानता वाढण्याची भीती आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
AI म्हणजे धोक्याची घंटा? पुढच्या 3 वर्षात 4,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार 'ही' बँक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement