भारतातील अनोखं मार्केट! जिथं बेकारातील बेकार वस्तूही होते मौल्यवान; म्हणतात, दगडही सोन्याच्या किमतीत खरेदी केले जातात
- Published by:Priya Lad
Last Updated:
Werid Market In India : भारतात एक असा बाजार आहे जो एका खास कारणामुळे चर्चेत असतो. असं म्हटलं जातं की या बाजारात दगडही सोन्याच्या किमतीला विकला जातो. तुम्हाला कचरा वाटणाऱ्या वस्तूंसाठीही खरेदीदार मिळतील. आश्चर्यकारक म्हणजे निरुपयोगी मानल्या जाणाऱ्या वस्तूंना इथं चांगली किंमत मिळते.
भोपाळ : भारतात लाखो मार्केट आहेत. फळ मार्केट, फूल मार्केट भाजी मार्केट, इलेक्ट्रॉनिक मार्केट, रद्दी मार्केट असे एक ना दोन कितीतरी मार्केट. असे वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट तुम्ही पाहिले असतील, तिथं गेला असाल. काही मार्केट विशिष्ट वस्तूंसाठीच असतं. पण तुम्ही कधी असं मार्केट पाहिले आहे का? जिथं अगदी धूळही विकली जाते. आम्ही तुम्हाला अशाच अनोख्या बाजारपेठेबाबत सांगणार आहोत.
भारतात एक असा बाजार आहे जो एका खास कारणामुळे चर्चेत असतो. असं म्हटलं जातं की या बाजारात दगडही सोन्याच्या किमतीला विकला जातो. तुम्हाला कचरा वाटणाऱ्या वस्तूंसाठीही खरेदीदार मिळतील. आश्चर्यकारक म्हणजे निरुपयोगी मानल्या जाणाऱ्या वस्तूंना इथं चांगली किंमत मिळते. अगदी लिंबाच्या वाळलेल्या सालींनाही.
advertisement
शेतकऱ्यांसाठी तर ही एक आवडती बाजारपेठ आहे. या बाजारात तुम्हाला शेतकरी विविध वस्तू विकत असल्याचं दिसून येईल.
इथं काय काय विकलं जातं?
तुमच्या घराभोवती अनेक कडुलिंबाची झाडं असतील. त्यांची पानं वाळल्यानंतर फेकून दिली जातात. पण या बाजारात शेतकरी ही पानंदेखील विकतात. वाळलेल्या कडुलिंबाची पानं इथं पोत्यांमध्ये भरून विकली जातात. ही पानं इथं एक हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलला विकली जातात. याशिवाय या बाजारात शेवग्याची पानंदेखील मोठ्या प्रमाणात विकली जातात. त्यांची किंमत प्रति क्विंटल दहा हजार रुपयांपर्यंत जाते.
advertisement
या बाजारात वाळलेल्या कढीपत्त्याची पानंही मोठ्या प्रमाणात विकली जातात. ती प्रति क्विंटल सात हजार तुकड्यांना विकली जातात. मेंदीची पानंही बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जातात. त्यांच्या किमती पानांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतात. बऱ्याचदा भृंगराज शेतकऱ्यांच्या शेतात तणाप्रमाणे वाढतात. ते या बाजारातही खरेदी केलं जातं.
advertisement
लोक इथं वाळलेलं गवत आणि पेंढादेखील विकतात. याशिवाय इथं वाळलेल्या लिंबाच्या सालीही विकल्या जातात. त्यांचा वापर औषधांमध्ये केला जातो. त्यामुळे इथून खरेदी केल्यानंतर लोक महागड्या वस्तूंमध्ये त्यांचा वापर करतात.
कुठे आहे हे मार्केट?
view commentsआता हे मार्केट कुठे आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर हे मार्केट आहे मध्य प्रदेशमध्ये. नीमच मंडी असं या मार्केटचं नाव आहे. तुम्ही मध्य प्रदेशला गेला आणि या बाजाराला भेट दिली आहे का? तुमचा तिथला अनुभव कसा आहे? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नसेल गेला तर कधी मध्य प्रदेशला गेलात तर या बाजारात नक्की जा.
Location :
Delhi
First Published :
November 15, 2025 7:00 AM IST
मराठी बातम्या/Viral/
भारतातील अनोखं मार्केट! जिथं बेकारातील बेकार वस्तूही होते मौल्यवान; म्हणतात, दगडही सोन्याच्या किमतीत खरेदी केले जातात


