India National Animal : भारतात गाईची पूजा करतात मग ती भारताचा राष्ट्रीय प्राणी का नाही, वाघच का?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Why Cow is Not National Animal : भारतात गाईला खूप महत्त्व आहे. गाईला गोमाता म्हणतात तिची पूजा केली जाते. मग गाय नाहीतर वाघाचीच राष्ट्रीय प्राणी म्हणून निवड का करण्यात आली?
advertisement
1973 साली रॉयल बंगाल टायगरला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आलं. त्यावेळी भारतात वाघांची संख्या झपाट्याने कमी होत होती. त्याच वर्षी वाघांची शिकार रोखण्यासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करण्यासाठी 'प्रोजेक्ट टायगर' सुरू करण्यात आला. पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीव संवर्धन मजबूत करण्यासाठी वाघाला राष्ट्रीय ओळख देण्यात आली. पर्यावरण मंत्रालयाच्या शिफारशीवरून केंद्र सरकारने वाघाला राष्ट्रीय प्राणी घोषित केलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
संविधानाच्या कलम 246(3) नुसार, केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये कायदेशीर अधिकार विभागले गेले आहेत. प्राण्यांचे संरक्षण आणि देखभाल हा राज्य सूचीतील विषय आहे. याचा अर्थ असा की या विषयावर कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही तर फक्त राज्य विधिमंडळांना आहे. म्हणून, केंद्र सरकारला हवं असलं तरी, कायदा करून ते थेट गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करू शकत नाही.
advertisement
advertisement
गाय भारताची राष्ट्रीय प्राणी नसली तर हिमाचल प्रदेशने 2015 मध्ये अधिकृतपणे गायीला आपला राज्य प्राणी घोषित केलं आहे. राज्य सरकारने गायीचे सांस्कृतिक, धार्मिक आणि ग्रामीण आर्थिक महत्त्व लक्षात घेऊन हा निर्णय घेतला. पशुपालन, दुग्ध उद्योग आणि ग्रामीण उपजीविकेत गायीची भूमिका ओळखणे हा त्याचा उद्देश होता. तर भारतात आईचा दर्जा दिलेली गाय नेपाळचा राष्ट्रीय प्राणी आहे.


