पाकिस्तानीच्या प्रेमात पडली भारतातील दहावीची विद्यार्थिनी, बुरखा घालून ट्रेनने भेटायला निघाली, पुढे घडलं असं की...

Last Updated:

Indian Girl Love Pakistani Boy : विद्यार्थिनीच्या फोनच्या तपासणीत असं दिसून आले की ती इन्स्टाग्रामवर एका पाकिस्तानी तरुणाशी सतत बोलत असे. ज्यावेळी पोलिसांनी तिला पकडलं तेव्हाही ती एका पाकिस्तानी तरुणाशी गप्पा मारत होती.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
पाटणा : बिहारच्या नवादामध्ये राहणारी मुलगी दहावीत शिकत होती. अकरावीत शिकणाऱ्या पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात ती पडली. सोशल मीडियावर त्यांची ओळख झाली. सुरुवातीला इन्स्टाग्राम आणि नंतर व्हॉट्सअपवरही त्यांची चॅटिंग सुरू झाली. दिवसरात्र त्यांच्यात चॅटिंग व्हायची. मुलीला सतत मोबाईलवर पाहिल्याने पालक तिला ओरडले. याचा राग तिला आला आणि ती घरातून गायब झाली.
advertisement
कुटुंबाने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी मुलीचा तपास सुरू केला. कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं होतं की ती नेहमीच मोबाईल फोनवर बोलत होती. ज्यासाठी तिला फटकारण्यात आलं आणि त्यानंतर ती घरातून पळून गेली.
फोन ट्रेसिंग करतात नवादा पोलिसांना प्रयागराजमध्ये तिचं लोकेशन सापडलं. महाबोधी एक्स्प्रेसमध्ये ती होती. आरपीएफ टीम महाबोधी एक्सप्रेसमध्ये पोहोचली तेव्हा ती बुरखा घातलेली आढळली. आरपीएफने व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबीयांसह मुलीची ओळख पटवली आणि मुलीला चाइल्ड लाइनच्या स्वाधीन केलं आणि तिचं समुपदेशन केलं.
advertisement
चाइल्ड लाइन टीमने विद्यार्थिनीचे समुपदेशन केलं तेव्हा तिचं पाकिस्तानी कनेक्शन हळूहळू उघड झालं. मुलीने पोलिसांना सांगितलं की काही महिन्यांपूर्वी तिची इन्स्टाग्रामवर पंजाबमधील एका मुलीशी मैत्री झाली. तिने दिल्लीला जाण्यासाठी ऑनलाइन ट्रेनचं तिकीट बुक केलं होतं. विद्यार्थिनीच्या फोनच्या तपासणीत असं दिसून आले की ती इन्स्टाग्रामवर एका पाकिस्तानी तरुणाशी सतत बोलत असे. ज्यावेळी पोलिसांनी तिला पकडलं तेव्हाही ती एका पाकिस्तानी तरुणाशी गप्पा मारत होती. पोलिसांचा आवाज ऐकून त्याने मुलीला अडवलं. 
advertisement
आता ही विद्यार्थीनी कोणत्या दहशतवादी संघटनेला बळी पडणार होती की आणखी काही बाब आहे याचा तपास सुरू आहे. शनिवारी स्थानिक आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानी कनेक्शनवर विद्यार्थ्याची कसून चौकशी केली. तथापि, आतापर्यंत गुप्तचर यंत्रणांना कोणताही ठोस पुरावा मिळू शकलेला नाही. ज्यामुळे ते कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलेले नाहीत. 
advertisement
मराठी बातम्या/Viral/
पाकिस्तानीच्या प्रेमात पडली भारतातील दहावीची विद्यार्थिनी, बुरखा घालून ट्रेनने भेटायला निघाली, पुढे घडलं असं की...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement