Indian Railway : 18 स्टेशन ओलांडून 147 किमी चुकीच्या ट्रॅकवर धावली ट्रेन आणि... भयंकर अपघातातून थोडक्यात बचावली
- Published by:Devika Shinde
Last Updated:
रेल्वेचा प्रवास हा सुखाचा असतो, पण असं असलं तरी देखील अधूनमधून रेल्वे अपघाताच्या बातम्या समोर येत असतात. अशीच एक घटना रविवारी घडली.
मुंबई : भारतीय रेल्वेचं नेटवर्क देशभरात पसरलं आहे. त्यामुळे तुम्हाला देशात कुठेही आणि कधीही जायचं असेल तरी देखील रेल्वेचा पर्याय नेहमीच खुला असतो. सगळ्यांच्या खिशाला परवडेल असा हा रेल्वेचा प्रवास असतो. त्यामुळे सगळ्याच श्रेणीचे लोक याने प्रवास करतात.
रेल्वेचा प्रवास हा सुखाचा असतो, पण असं असलं तरी देखील अधूनमधून रेल्वे अपघाताच्या बातम्या समोर येत असतात. अशीच एक घटना रविवारी घडली. पण नशिबाने कोणतीही मोठी घटना घडली नाही ज्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले.
खरंतर एक डबलडेकर ट्रेन आपला रस्ता चुकली, आश्चर्य म्हणजे ही ट्रेन चक्क 147 किमी चुकीच्या ट्रॅकवर धावत होती. एवढंच काय तर स्थानकांवर तैनात असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ज्यामुळे ट्रेनसोबत मोठी दुर्घटना घडणार होती. पण नशिबाने वेळेत चुक लक्षात आली.
advertisement
अहवालानुसार, खांडवा रेल्वे स्थानकातून निघालेली डबल डेकर मालगाडी थोड्या अंतरावर गेल्यानंतर रस्ता चुकली. ही डबल डेकर मालगाडी भुसावळ स्थानकातून चुकीच्या मार्गावर धावत 147 किमी अंतरावरील खंडवा यार्डात पोहोचली होती.
या संपूर्ण प्रकरणात रेल्वे कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. विशेष म्हणजे रेल्वे मार्गावर मालगाडीसाठी स्वतंत्र ट्रॅक असूनही 18 रेल्वे स्थानकांवर हिरवा झेंडा दाखवून मालगाडी पुढे रवाना करण्यात आली, मात्र खंडवा यार्डात येताच डबल डेकर मालगाडी येथे बसवण्यात आलेल्या OHE ला धडकली, त्यानंतर OHE मधील विद्युत पुरवठा बंद झाला, त्यामुळे हा अपघात टळला.
advertisement
डबल डेकरमध्ये 264 एसयूव्ही गाड्या ठेवण्यात आल्या होत्या, ही ट्रेन चुकीच्या मार्गावर 147 किमी धावली. या अपघातानंतर मोठ्या प्रयत्नाने रेल्वेने ओएचईची उंची वाढवून चुकीच्या मार्गावर असलेली मालगाडी भुसावळला परत पाठवली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 10, 2025 7:31 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Indian Railway : 18 स्टेशन ओलांडून 147 किमी चुकीच्या ट्रॅकवर धावली ट्रेन आणि... भयंकर अपघातातून थोडक्यात बचावली