दुबईत भारतीयावर पैशांचा पाऊस! UAE मध्ये सिक्युरिटी गार्ड रातोरात करोडपती, मिळाले 59 कोटी, पण कसे?

Last Updated:

Indian won Dubai big ticket winner : सिक्युरिटी गार्ड असलेला आशिक गेल्या 19 वर्षांपासून संयुक्त अरब अमिराती म्हणजे यूएईमध्ये राहतो. एका रात्रीत त्याचं नशीब पालटलं आहे. असं काहीतरी घडलं की तो एका रात्रीत करोडपती झाला आहे.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
दुबई : 'देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड़ के', हे वाक्य तुम्ही ऐकलंच असेल. याचाच प्रत्यय आला तो दुबईत राहणाऱ्या एका भारतीयाला. सिक्युरिटी गार्ड असलेला आशिक गेल्या 19 वर्षांपासून संयुक्त अरब अमिराती म्हणजे यूएईमध्ये राहतो. एका रात्रीत त्याचं नशीब पालटलं आहे. असं काहीतरी घडलं की तो एका रात्रीत करोडपती झाला आहे. त्याने थोडेथोडके नव्हे तर तब्बल 59 कोटी रुपये जिंकले आहेत. आता ते कसे? हे जाणून घेण्याची इच्छा तुम्हाला असेल,
आशिक पतिनहरथ 38 वर्षांचा आहे. तो केरळचा रहिवासी, यूएईमध्ये एकटाच राहतो. त्याचं कुटुंब भारतात राहतं. गेल्या 10 वर्षांपासून तो एकटाच लकी ड्रॉची तिकिटं खरेदी करत आहे. इतक्या वर्षात त्याला कधीच लकी ड्रॉ लागला नाही, पण तरी त्याने कधीही धीर सोडला नाही. अखेर त्याने बिग तिकीट रॅफलमध्ये 2.5 कोटी दिरहम म्हणजे सुमारे 59 कोटी रुपयांचं बक्षीस जिंकलं आहे.
advertisement
आशिक धक्क्यात
खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार आशिक म्हणाला, 'मी अजूनही धक्क्यात आहे. जेव्हा मला मी लकी ड्रॉ जिंकल्याचाफोन आला तेव्हा माझं हृदय वेगाने धडधडू लागले. मी लाईव्ह ड्रॉ पाहत नव्हतो. मी अखेर 10 वर्षांनी एक मोठं बक्षीस जिंकलं. त्यामुळे हे खूप मोठं आश्चर्य होतं. तुम्ही माझ्या आनंदाची कल्पनाही करू शकत नाही.
advertisement
इतक्या पैशांचं काय करणार असं विचारल्यावर आशिक म्हणाला की त्याची पहिली प्राथमिकता त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणं आहे. तो म्हणाला, 'मी बिग तिकीट खरेदी करत राहिन. इतर लोकांना माझा सल्ला आहे की तिकिटं खरेदी करा. एक दिवस तुमचंही नशीब पालटेल.
आणखी एका भारतीयाने जिंकले लाखो रुपये
आशिकशिवाय आणखी एका भारतीयाने लाखो रुपये जिंकले आहेत. शानवास कन्नोथ हमजा असं या भारतीयाचं नाव. मूळचा चेन्नईचा असलेला 58 वर्षांचा हा व्यावसायिक. या आठवड्यात त्याने 2.5 लाख दिरहम म्हणजे अंदाजे 60 लाख रुपये जिंकले आहेत. 2017 पासून तो त्याच्या जवळच्या मित्रासह बिग तिकीट खरेदी करत आहे.
advertisement
तो म्हणाला, 'मी एका मीटिंगमध्ये होतो तेव्हा माझा फोन सतत वाजू लागला. सुरुवातीला मला वाटलं की हा स्पॅम कॉल आहे, पण मी फोन उचलताच तो शोचा होस्ट रिचर्ड होता. मी हा पुरस्कार माझ्या व्यवसायात आणखी गुंतवेन. मी इतरांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला हे जिंकायचं असेल तर तिकिटं खरेदी करत रहा.
मराठी बातम्या/Viral/
दुबईत भारतीयावर पैशांचा पाऊस! UAE मध्ये सिक्युरिटी गार्ड रातोरात करोडपती, मिळाले 59 कोटी, पण कसे?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement