India Temple : भारतातील अनोखं देवरानी-जेठानी मंदिर, बांधलंय 2 सुनांनी, इथं कुणाची पूजा होते?

Last Updated:

Temple In India : स्थानिक आणि पर्यटक दोघंही मोठ्या संख्येने देवरानी-जेठानी मंदिराला भेट देतात आणि त्याची रहस्यमय कहाणी जाणून घेण्यास उत्सुक असतात.

News18
News18
भारतात बरीच मंदिरं आहेत. सामान्यपणे मंदिर त्या मंदिरातील देवांवरून ओळखली जातात, जसं की साईबाबाचं मंदिर, गणपतीचं मंदिर, शंकराचं मंदिर, कृष्णाचं मंदिर, विठ्ठल-रुक्मिणीचं मंदिर. तुम्हाला आश्चर्य वाटेल एक असं मंदिर जे दोन जावांवरून ओळखलं जातं. देवरानी-जेठानी मंदिर जे 2 सुनांनी बांधलं आहे.
ही मंदिरं शेकडो वर्षे जुनी आहेत आणि भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी बांधली गेली होती. दोन्ही मंदिरं भगवान कृष्णाला समर्पित आहेत. या मंदिराचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगांची अनोखी स्थापना. एका मंदिरात 11 शिवलिंगे आहेत. शिवपूजेची सखोल परंपरा असलेल्या या प्रदेशात या शिवलिंगांचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व खूप आहे. भाविकांचा असा विश्वास आहे की या शिवलिंगांना पाणी अर्पण केल्याने घरात शांती, आनंद, समृद्धी आणि स्थिरता येते.
advertisement
याव्यतिरिक्त मंदिरात एक खास हवन छत्रदेखील आहे जिथं वेळोवेळी हवन आणि धार्मिक विधी केले जातात. भगवान श्रीकृष्णाच्या सुंदर मूर्ती आणि मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या कलात्मक नक्षीकाम दशकांपूर्वीच्या काळाइतकेच मनमोहक आहेत. हे मंदिर भक्त आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. शतकानुशतके जुने हे मंदिर संकुल अजूनही पूर्वीसारखेच मजबूत आणि सुंदर आहे. ही मंदिरं राजस्थानच्या पारंपारिक बांधकाम शैली आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब पाडतात.
advertisement
ही मंदिरे केवळ त्यांच्या अद्वितीय स्थापत्य शैलीसाठीच नव्हे तर त्यांच्यामागील आकर्षक कथेसाठी देखील ओळखली जातात. त्या काळातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेल्या बयानी कुटुंबाच्या दोन सुनांनी हे मंदिर उभारलं.
मंदिराशी संबंधित एक अनोखी कथा
असं म्हटलं जातं की शेकडो वर्षांपूर्वी सिकरमधील दोन भावजयी भगवान श्रीकृष्णाच्या निस्सीम भक्त होत्या आणि दररोज मदन मोहन मंदिरात पूजा करण्यासाठी जात असत. एके दिवशी मोठी भावजय आधी मंदिरात गेली आणि तिने दरवाजे बंद करून घेतले. छोटी भावजय मंदिराचा दरवाजा उघडून आत घेण्यासाठी विनवणी करत होती. तेव्हा मोठ्या भावजयीने  तुला पूजा करायची असेल तर स्वतःचं वेगळं मंदिर बांध असं सांगितलं. त्यानंतर 1949 मध्ये छोट्या भावजयीने एक नवीन मंदिर बांधलं, जे आता देवरानी मंदिर म्हणून ओळखलं जातं. या भक्ती आणि श्रद्धेमुळे या जागेला देवरानी-जेठानी मंदिर असं नाव मिळालं, जे आता दूरवर प्रसिद्ध आहे.
advertisement
आता हे मंदिर कुठे आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल, तर हे मंदिर आहे राजस्थानात. सीकर जिल्ह्यात सीकर शहरातील चांदपोल गेटजवळ असलेली ही मंदिरं एकमेकांसमोर असल्याने त्यांना आमनेसामने असलेलं मंदिरही म्हटलं जातं. तुम्हालाही या मंदिराची भेट देण्याची इच्छा झाली असेल तर नक्की द्या आणि कसं वाटलं आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/Viral/
India Temple : भारतातील अनोखं देवरानी-जेठानी मंदिर, बांधलंय 2 सुनांनी, इथं कुणाची पूजा होते?
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement