ISRO ची कमाल! Elon Musk यांच्या रॉकेटमधून अंतराळात सोडला भारताचा GSAT-20; पण याचा फायदा काय?

Last Updated:

इस्रोने एलन मस्क यांच्या स्पेसएक्स या अमेरिकन एअरोस्पेस कंपनीसोबत मोठी कामगिरी केली आहे. भारताचा जीसॅट-20 हा उपग्रह स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे अंतराळात सोडण्यात आला.

इस्रो-स्पेसएक्सने लाँच केली सॅटेलाइट
इस्रो-स्पेसएक्सने लाँच केली सॅटेलाइट
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने एलन मस्क यांच्या स्पेसएक्स या अमेरिकन एअरोस्पेस कंपनीसोबत मोठी कामगिरी केली आहे. भारताचा जीसॅट-20 हा उपग्रह स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे अंतराळात सोडण्यात आला. हा उपग्रह अंतराळात लाँच करण्यात आला. ही भागीदारी भारतीय अंतराळ मोहिमेसाठी मोठं यश मानलं जात आहे.
इस्रो आणि मस्क यांच्या कंपनीची ही पहिली व्यावसायिक भागीदारी आहे. या अंतर्गत जीसॅट-20 हा भारताचा कम्युनिकेशन उपग्रह 19 नोव्हेंबर 2024 रोजी लाँच करण्यात आला. अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथल्या केप कॅनाव्हरलमधून स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे हा उपग्रह अंतराळात झेपावला.
काय आहे जीसॅट-20?
जीसॅट-20 ला जीसॅट -एन2 असंदेखील संबोधलं जातं. भारतातली दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी हा उपग्रह विकसित केलेला आहे. त्याचं वजन 4700 किलोग्रॅम आहे. तो इस्रोच्या एलव्हीएम -3 रॉकेटच्या क्षमतेपेक्षा जास्त वजनदार आहे. ते रॉकेट 4000 किलोग्रॅमपर्यंत वजनाचं पेलोड जिओसिन्क्रोनस ट्रान्स्फर ऑर्बिटमध्ये करू शकतं. या कारणामुळे इस्रोला हा उपग्रह लाँच करण्यासाठी स्पेसएक्सचे सहकार्य घ्यावं लागलं.
advertisement
इस्रो या अवजड उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी यापूर्वी युरोपियन एरियनस्पेस सर्व्हिसवर अवलंबून होती; पण त्यांच्याकडे सध्या ऑपरेशनल रॉकेटची कमतरता आहे. रशिया आणि चीनमधला भू-राजकीय तणाव पाहता स्पेसएक्स हा योग्य पर्याय वाटला. त्यामुळे इस्रोने या कंपनीचं सहकार्य घेतलं आहे.
कसं आहे फाल्कन 9?
एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या फाल्कन 9 रॉकेटने अंतराळ मोहिम क्षेत्रात नवीन क्रांती केली आहे. तांत्रिक क्षमता, किफायतशीर किंमत आणि पुनर्वापर करता येणं यासाठी जागतिक स्तरावर अंतराळ मोहिमांसाठी या रॉकेटला पसंती मिळत आहे. वारंवार पुनर्वापर हे फाल्कन 9 रॉकेटचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य आहे. हे रॉकेट लाँचिंगनंतर त्याचा पहिला टप्पा पुन्हा पृथ्वीवर पाठवून देतं. यामुळे त्याचा पुनर्वापर करता येतो. यामुळे मोहिमेचा खर्च कमी होतो. पारंपरिक रॉकेट्स लाँचिंगनंतर वापर झाल्यावर समुद्रात कोसळतात. त्यामुळे ती नष्ट होतात. फाल्कन 9 मुळे ही समस्या सुटली आहे.
advertisement
फाल्कन 9 रॉकेट जड पेलोड वाहून नेऊ शकतं. हे रॉकेट लो अर्थ ऑर्बिटपर्यंत 22,800 किलोपर्यंतचं पेलोड आणि जिओसिंक्रोनस ट्रान्स्फर ऑर्बिटपर्यंत 8300 किलोपर्यंतचं पेलोड वाहून नेऊ शकतं. इस्रोच्या जीसॅट-20 उपग्रहाचे वजन 4700 किलोग्रॅम आहे. त्यामुळे या मोहिमेसाठी फाल्कन 9 हा योग्य पर्याय ठरतो.
advertisement
काय करणार जीसॅट-20?
हा उपग्रह 14 वर्षांच्या मोहिमेसह बँड हायथ्रुपुट संचार पेलोडने सक्षम आहे. हा उपग्रह देशभरात महत्त्वाच्या सुविधा पुरवेल. त्यात दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इन-फ्लाइट इंटरनेट सेवेचा समावेश आहे. तसंच या उपग्रहाला 32 युझर बीम असतील. त्यात आठ नॅरो बीम, तर 24 कॉम्प्रिहेन्सिव्ह बीम असतील. या बीम देशाच्या अनेक भागांमध्ये असलेल्या हब स्टेशन्सला जोडतील.
advertisement
इस्रो आणि स्पेसएक्सची आणखी एक मोहीम
यासोबतच इस्रो आणि स्पेसएक्स आणखी एका ऐतिहासिक मोहिमेत अप्रत्यक्षपणे सहकार्य करत आहेत. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना 2025मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्याची योजना आहे. ही मोहिम स्पेसएक्सच्या माध्यमातून नाही; मात्र त्यांना पाठवण्यासाठी वापरलं जाणारं यान म्हणजे स्पेसएक्सची ड्रॅगन कॅप्सूल असेल.
मराठी बातम्या/Viral/
ISRO ची कमाल! Elon Musk यांच्या रॉकेटमधून अंतराळात सोडला भारताचा GSAT-20; पण याचा फायदा काय?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement