KBC 17 : हा होता 7 कोटींचा अवघड प्रश्न, ज्याचं उत्तर IPS आदित्य कुमार यांना ही देता आलं नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
उत्तराखंडचे आदित्य कुमार हे IPS ऑफिसर आहेत, जे सध्या गुजरातमध्ये कार्यरत आहेत. नक्कीच आदित्य यांच्या अभ्यासाचा फायदा त्यांना केबीसीमध्ये करोडपती बनण्यासाठी फायद्याचा ठरला.
मुंबई : भारतातील सर्वात लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) ने आपल्या 17 व्या सीझनमधील पहिला करोडपती प्रेक्षकांसमोर आणला आहे. उत्तराखंडचे आदित्य कुमार यांनी आपल्या बुद्धिमत्ता आणि शांत डोक्यामुळे 1 कोटी रुपयांचा टप्पा गाठत करोडपती होण्याचा मान पटकावला. मात्र 7 कोटी रुपयांच्या अंतिम प्रश्नावर ते अडकले आणि खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.
उत्तराखंडचे आदित्य कुमार हे IPS ऑफिसर आहेत, जे सध्या गुजरातमध्ये कार्यरत आहेत. नक्कीच आदित्य यांच्या अभ्यासाचा फायदा त्यांना केबीसीमध्ये करोडपती बनण्यासाठी फायद्याचा ठरला. पण असं असलं तरी 7 कोटींसाठी त्यांना असा एक प्रश्न विचारला गेला, ज्याचं उत्तर त्यांना देता आलं नाही ज्यामुळे अखेर त्यांना ही हार मानत 1 कोटी रुपये घेऊन समाधानी व्हावं लागलं.
advertisement
आधी आदित्य यांना विचारला गेलेला 1 कोटी रुपयांचा प्रश्न काय होता आणि त्याचं उत्तर काय आहे हे जाणून घेऊ.
प्रश्न: पहिला अणुबॉम्बमध्ये वापरल्या गेलेल्या प्लुटोनियम घटकाला वेगळे करणाऱ्या शास्त्रज्ञाच्या नावावर खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचे नाव ठेवले आहे?
पर्याय: A) सीबोर्गियम B) मेन्डेलीवियम C) रदरफोर्डियम D) बोह्रियम
या प्रश्नावर आदित्यने 50-50 लाइफलाईनचा वापर केला. शेवटी उरलेले पर्याय होते A) सीबोर्गियम आणि D) बोह्रियम. त्यांनी धाडसाने A) सीबोर्गियम हा पर्याय निवडला आणि तो बरोबर ठरला. अशा प्रकारे त्यांनी 1 कोटी रुपये जिंकले.
advertisement
7 कोटी रुपयांचा प्रश्न : ज्यामुळे खेळ सोडला
प्रश्न: 1930 च्या दशकात भारतात आलेल्या आणि ताजमहाल, सांची स्तूप आणि एलोरा लेणी यांचे प्रसिद्ध चित्रसंच काढणारे जपानी कलाकार कोण?
पर्याय: A) हिरोशी सुगिमोटो B) हिरोशी सेंजू C) हिरोशी योशिदा D) हिरोशी नाकाजिमा
या प्रश्नावर आदित्य यांनी धोका न पत्करता खेळ सोडला आणि 1 कोटी रुपये घेऊन घरी परतले. तसेच त्यांना मारुती सुझुकी ब्रेझा कारही बक्षीस म्हणून मिळाली. योग्य उत्तर होते C) हिरोशी योशिदा.
advertisement
advertisement
अमिताभ बच्चन यांच्या सोबतचा अनुभव
view commentsआदित्यने केबीसीमधून मिळालेला अनुभव शेअर करताना सांगितले की, “अमिताभ सर यांची व्यक्तिमत्त्वाची जादू वेगळीच आहे, पण त्यांच्या नम्रतेने माझे मन जिंकले. त्यांनी माझ्या आयुष्याबद्दल विचारले, दडपण वाढले तेव्हा मला प्रोत्साहन दिले आणि माझ्या ज्ञानावर आधारित खेळासाठी कौतुक केले. खरं सांगायचं तर त्यांचं कौतुक माझ्यासाठी पैशांपेक्षा मोठं बक्षीस होतं.”
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 21, 2025 9:33 PM IST
मराठी बातम्या/Viral/
KBC 17 : हा होता 7 कोटींचा अवघड प्रश्न, ज्याचं उत्तर IPS आदित्य कुमार यांना ही देता आलं नाही


