बायकोचं ऐकलं अन् नशीब पालटलं! रातोरात 33 कोटीचा मालक झाला व्यक्ती, पण कसं?

Last Updated:

पत्नीच्या सांगण्यावरुन त्याने एका क्रमांकाचं लॉटरी तिकिट निवडलं होतं. आता पत्नीचं ऐकल्याचा त्याला मोठा फायदा झाला असून लॉटरीमध्ये तो 33 कोटी रूपये जिंकला आहे

राजीव अरिक्कट असं या व्यक्तीचं नाव आहे
राजीव अरिक्कट असं या व्यक्तीचं नाव आहे
नवी दिल्ली : कोणाचं नशीब कधी पलटेल हे कोणीच सांगू शकत नाही. तुम्ही अनेकदा अशा बातम्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील, ज्यात काही लोक रातोरात करोडपती झाले. तर, काहीवेळी लोक रातोरात रस्त्यावर आल्याच्या बातम्याही समोर येतात. बऱ्याचदा अमेरिका किंवा आखाती देशांमध्ये लोकांनी कोट्यवधी रुपयांची लॉटरी जिंकल्याच्या बातम्याही समोर येत असतात. मात्र, आता अशीच एक मोठी लॉटरी एका भारतीय व्यक्तीने जिंकली आहे.
संयुक्त अरब अमिरातमध्ये त्यांने ही लॉटरी जिंकली आहे. तो मूळचा केरळमधील आहे. पत्नीच्या सांगण्यावरुन त्याने एका क्रमांकाचं लॉटरी तिकिट निवडलं होतं. आता पत्नीचं ऐकल्याचा त्याला मोठा फायदा झाला असून लॉटरीमध्ये तो 33 कोटी रूपये जिंकला आहे. राजीव अरिक्कट असं या व्यक्तीचं नाव असून ते 40 वर्षांचे आहेत. राजीव हे आर्किटेक्चरल ड्राफ्टस्मन म्हणून काम करतात. ते गेल्या 10 वर्षांपासून अल ऐनमध्ये राहतात. त्यांनी सांगितलं की, मी गेल्या तीन वर्षांपासून लॉटरीचं तिकीट खरेदी करत आहे. मात्र, मी पहिल्यांदाच इतकी मोठी रक्कम जिंकली आहे.
advertisement
कसा निवडला नंबर?
हा व्यक्ती लॉटरीचं तिकिट खरेदी करत असताना त्याच्या पत्नीने त्याला 7 आणि 13 क्रमांकाचं तिकिट निवडण्याचा सल्ला दिला. कारण, या त्यांच्या दोन मुलांच्या जन्मतारखा होत्या. अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित करण्यात येणाऱ्या या लॉटरीत त्यांनी मोफत तिकीट घेतलं आणि रातोरात नशीब पालटलं. त्यांनी 33 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे.
मराठी बातम्या/Viral/
बायकोचं ऐकलं अन् नशीब पालटलं! रातोरात 33 कोटीचा मालक झाला व्यक्ती, पण कसं?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement