Kitchen Jugaad Video : मिठात डिटर्जंट टाकून वापरून पाहा, हॉटेलमध्येही हेच करतात

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : एका महिलेने मीठ आणि डिटर्जंट एकत्र करून त्याचा वापर करून दाखवला आहे. तुम्ही विचारही करणार नाही अशी कमाल या मीठ-डिटर्जंटच्या मिश्रणाने केली आहे. ती नेमकी काय ते पाहुयात.

News18
News18
मुंबई : मीठ सामान्यपणे आपण जेवणात वापरतो. मिठामुळे कोणत्याही पदार्थाला चव येते. मीठ नसेल तर पदार्थ बेचव लागतो. पण अशा मिठात तुम्ही डिटर्जंट टाकून पहिला आहे का? अशा एका किचन जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका महिलेने मीठ आणि डिटर्जंट एकत्र करून त्याचा वापर करून दाखवला आहे. तुम्ही विचारही करणार नाही अशी कमाल या मीठ-डिटर्जंटच्या मिश्रणाने केली आहे. ती नेमकी काय ते पाहूयात.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता महिला लिक्विड डिटर्जंट घेते. एका वाटीत ती काढते. त्यात चमचाभर मीठ टाकते. बेकिंग सोडाही अॅड करते. हे मिश्रण चमच्याने ढवळून घेते आणि एका बाटलीत भरते. आता याचं काय करायचं? तर हा तुमचा क्लिनर तयार झाला. म्हणजे महिला याने आधी किचन सिंक धुवून दाखवते. नंतर चिकट डाग असलेला कुकर घासते. ज्यावरील डाग या मिश्रणामुळे सहज निघतात. त्यानंतर याच लिक्विडने ती टॉयलेटही स्वच्छ करून दाखवते. अशा या मीठ डिटर्जंटच्या मिश्रणाने कमालच करून दाखवली, हो की नाही?
advertisement
simple & fast यू ट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा जुगाड हॉटेल मधील आहे. बर्‍याच हॉटेल मध्ये असं केलं जातं. एका हॉटेल मालकाने च आपल्याला हा जुगाड सांगितला, असं या महिलेने व्हिडिओत सांगितलं आहे.
advertisement
तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
(सूचना : हा लेख सोशल मीडिया वरील व्हायरल व्हिडिओ वर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : मिठात डिटर्जंट टाकून वापरून पाहा, हॉटेलमध्येही हेच करतात
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement