Kitchen Jugaad Video : फ्रिजमध्ये चष्मा ठेवताच कमाल, आश्चर्यचकीत करणारा परिणाम
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kitchen Tips In Marathi : फ्रिजमध्ये चष्मा ठेवण्याचा हा जबरदस्त असा जुगाड एका गृहिणीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मुंबई : आतापर्यंत फ्रिजमध्ये तुम्ही पाण्याची बाटली, कोल्ड ड्रिंक, आईस्क्रिम, फळं-भाज्या, दूध, शिल्लक पदार्थ असं काही ना काही ठेवत आलात. पण कधी फ्रिजमध्ये चष्मा ठेवून पाहिला आहेत का? फ्रिजमध्ये चष्मा ठेवताच अशी कमाल होते की तुम्ही विचारही केला नसेल. फ्रिजमध्ये चष्मा ठेवण्याचा आश्चर्यकारक असा परिमाण आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
एका गृहिणीने शेअर केलेला चष्मा आणि फ्रिजच्या जुगाडाचा हा व्हिडीओ. गृहिणींकडे किती तरी घरगुती जुगाड असतात. अशाच जुगाडापैकी हा एक जुगाड. ज्यात या गृहिणीने फ्रिजमध्ये चष्मा ठेवून दाखवला आहे आणि त्याचा काय फायदा, काय परिणाम होतो, ते तिने दाखवलं आहे. अगदी सोपा असा उपाय आहे पण त्याचा फायदा मात्र खूप मोठी आहे.
advertisement
व्हिडीओत गृहिणीने सांगितल्यानुसार तुमच्या घरात जितके चष्मे असतील ते फ्रिजच्या फ्रिजरमध्ये ठेवा. पण चष्मे फ्रिजरमध्ये ठेवण्याआधी फ्रिज बंद करा. चष्मे फ्रिजरमध्ये ठेवल्यानंतर फ्रिजचा दरवाजा बंद करा. 10-15 मिनिटांनंतर हे चष्मे फ्रिजमधून बाहेर काढा. तुम्ही पाहिलं तर चष्मावर वाफ जमा झालेली असेल. आता चष्मा पुसण्यासाठी एक कापड असतो, त्या कापडाने या चष्म्यावरील वाफ पुसून घ्या.
advertisement
बऱ्याचदा आपण चष्मा कुठेही कसाही ठेवतो, कोणत्याही कापडाने त्याची काच पुसतो. त्यामुळे चष्म्यावर ओरखडे आलेले असतात. काही केल्या ते लवकर जात नाहीत. पण तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलेला हा चष्मा पुसल्यानंतर पाहा. त्याच्यावरील ओरखडे गायब झालेले दिसतील. चष्म्याची काच एकदम नव्यासारखी स्वच्छ झालेली आहे. जे इतके प्रयत्न करून शक्य झालं नाही ते काही मिनिटांत शक्य झालं आहे.
advertisement
Location :
Delhi
First Published :
April 21, 2025 3:11 PM IST