Kitchen Jugaad Video - वॅसलिनचा असा वापर तुम्हाला माहितीच नसेल; गॅसला लावताच कमाल झाली
- Published by:Priya Lad
Last Updated:
वॅसलिनचा आणखी एक अनोखा असा वापर एका गृहिणीने करून दाखवला आहे. या किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
नवी दिल्ली : थंडी सुरू झाली की वॅसलिनचा वापर सुरू होतो. प्रत्येकाकडे वॅसलिन पाहायला मिळेल. वॅसलिन हिवाळ्यात कोरडी होणारी ओठ आणि त्वचा मुलायम ठेवते. पण याशिवायही वॅसलिनचा आणखी एक अनोखा असा फायदा आहे. वॅसलिन गॅसला लावताच कमाल झाली. या किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
ओठ, त्वचेसाठी लावल्या जाणाऱ्या वॅसलिनचा असा वापरही होऊ शकतो याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. हा जुगाड का तुम्ही एकदा पाहाल तर नेहमी हा उपाय कराल. आता गॅसवर वॅसलिन लावायचं म्हणजे नेमकं कसं, त्याचा काय फायदा असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल आणि ते जाणून घेण्याची उत्सुकताही असेल. चला तर मग पाहुयात.
advertisement
तुम्हाला करायचं काय आहे? तर वॅसलिन गॅसला लावायचं आहे. टिश्यू पेपर, कापडावर वॅसलिन घ्या. संपूर्ण गॅसला हे वॅसलिन लावा. यामुळे गॅसवर वॅसलिनची लेअर तयार होईल. आता याचा फायदा काय तर... गॅसवर कधीतरी चहा, दूध, आमटी, डाळ उतू जाते. भाजी किंवा आणखी काही ना काही गॅसवर सांडतं. आपण पाण्याने गॅस पुसून घेतो किंवा धुवून घेतो. पण नेहमी असं केल्याने गॅस खराब होऊ शकतो. शिवाय चिकट डागही सहज निघत नाहीत. पण जर का गॅसला वॅसलिन लावलेलं असेल तर ही गॅस सहज स्वच्छ होईल.
advertisement
तुम्ही वॅसलिन वापरत असाल तर ते किचन सिंकमध्ये ठेवून पाहा. वॅसलिन किचन सिंकमध्ये ठेवण्याचा मोठा फायदा आहे. असा की तुम्हीही विचार केला नसाल. Prajakta Salve या युट्युब चॅनेलवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
advertisement
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
Location :
Delhi
First Published :
March 16, 2024 6:00 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video - वॅसलिनचा असा वापर तुम्हाला माहितीच नसेल; गॅसला लावताच कमाल झाली