तिरुपतीत बाईकस्वारांवर बिबट्याचा हल्ला, काही इंचांच्या फरकानं वाचला जीव, Video श्वास रोखणारा

Last Updated:

ही घटना आंध्र प्रदेशातील तिरुपतीजवळील एस.व्ही. प्राणी संग्रहालयाच्या (SV Zoo Park) रस्त्यावर मध्यरात्री घडली. एका कारच्या डॅशकॅममध्ये हा थरारक प्रसंग कैद झाला आहे.

व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
मुंबई : बऱ्याचदा जंगलाजवळच्या रस्त्यांवरून जाताना जंगली प्राणी किंवा पक्षी दुरवरुन पाहायला मिळतात, हा थरार पाहायला लोकांना आवडतं, पण कधीकधी वेळ चुकली की मात्र हा अनुभव जीवघेणाही ठरु शकतो. असाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका बाईकस्वारावर आणि त्याच्या पिलियन रायडरवर अचानक बिबट्याने झेप घेतली.
ही घटना आंध्र प्रदेशातील तिरुपतीजवळील एस.व्ही. प्राणी संग्रहालयाच्या (SV Zoo Park) रस्त्यावर मध्यरात्री घडली. एका कारच्या डॅशकॅममध्ये हा थरारक प्रसंग कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की, दुचाकी जशी पुढे जाते तशी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीतून अचानक बिबट्या धाव घेतो आणि बाइकवर झेपावतो. काही इंचांच्या अंतराने बाईकस्वारांचा जीव वाचतो आणि बिबट्या पुन्हा अंधारात निघून जातो.
advertisement
विशेष म्हणजे, बाईकस्वार आणि मागे बसलेला व्यक्तीला बिबट्या असल्याचं काही क्षणासाठी जाणवत देखील नाही. त्यांनी गाडी न थांबवता वेगाने पुढे नेली आणि अनपेक्षितपणे स्वतःचा जीव वाचवला.
या घटनेनंतर तिरुपती परिसरात वाढत चाललेल्या बिबट्याच्या हालचालींबद्दल नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. विशेषतः तिरुमला आणि अलीपीरी पादचारी मार्गांवर अशा घटना वारंवार घडत आहेत. मार्च महिन्यातही एका बिबट्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं, जे अलीपीरी फूटपाथजवळील गळिगोपुरम दुकानांच्या भागात मध्यरात्रीच्या सुमारास फिरताना दिसला होता. त्या वेळी सुदैवाने कोणीही भाविक त्या ठिकाणी उपस्थित नव्हते.
advertisement
advertisement
या पार्श्वभूमीवर तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) संस्थेने पूर्वीच काही काळजी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. भाविकांना समूहामध्ये चालण्यास सांगण्यात आलं होतं.
या घटनेमुळे पुन्हा एकदा तिथल्या वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी त्वरित पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
तिरुपतीत बाईकस्वारांवर बिबट्याचा हल्ला, काही इंचांच्या फरकानं वाचला जीव, Video श्वास रोखणारा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement