Mahabharat : महाभारत काळात कुंतीला दिलेला शाप, आजही भोगत आहेत सर्व महिला

Last Updated:

Mahabharat Story : महाभारतात एक घटना आहे ज्यात माता कुंतीला तिचाच मुलगा युधिष्ठिरने शाप दिल्याचं वर्णन केलं आहे. या शापाचा प्रभाव आजही महिलांवर असल्याचं मानलं जातं.

AI Generated image
AI Generated image
नवी दिल्ली : महाभारत काळात अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्या आजही संस्मरणीय आहेत. महाभारत युद्ध कौरव आणि पांडव यांच्यात झाले. पण तुम्हाला माहित आहे का महाभारत काळात दिलेला एक शाप आजही सर्व महिला भोगत आहेत. युद्धिष्ठरने आपली माता कुंतीला दिलेला हा शाप. हा शाप कोणता आहे, ते जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
महाभारतात एक घटना आहे ज्यात माता कुंतीला तिचाच मुलगा युधिष्ठिरने शाप दिल्याचं वर्णन केलं आहे. या शापाचा प्रभाव आजही महिलांवर असल्याचं मानलं जातं. कथेनुसार महाभारत युद्ध संपलं तेव्हा माता कुंती कर्णाचा मृतदेह आपल्या मांडीवर घेऊन रडत होती. हे दृश्य पाहून पांडव आश्चर्यचकित झाले. शत्रूच्या मृत्यूवर माता कुंती का रडत आहे, हे पांडवांनी तिला विचारलं. तेव्हा कर्ण आपला मोठा मुलगा असल्याचं तिनं आपल्या मुलांना सांगितलं.
advertisement
कसा झाला होता कर्णाचा जन्म
महाभारत ग्रंथात सांगिल्यानुसार, एकदा दुर्वासा ऋषी कुंतीच्या सेवेने खूप आनंदित झाले. त्यांनी खुश होऊन कुंतीला एक मंत्र दिला. या मंत्राचा जप करून ज्या देवाची ती आराधना करेल, त्या देवाचा पुत्र तिला प्राप्त होईल, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
या मंत्राचं परीक्षण करण्याचा विचार कुंतीच्या मनात आला. तिने सूर्यदेवाचं आवाहन केलं. सूर्यदेवाकडून तिला कवचकुंडल असलेल्या पुत्राची प्राप्ती झाली. पण लग्नाशिवाय जन्माला आलेलं हे मूल, लोक काय म्हणतील या भीतीनं कुंतीने मुलाला एका डब्यात ठेवून नदीत सोडलं.
युधिष्ठिरने कुंतीला दिला शाप
कर्णाबाबत माता कुंतीने जे सांगितलं ते ऐकून युधिष्ठिरला राग आला आणि त्यानं माता कुंतीला शाप दिला. आजपासून संपूर्ण स्त्री जाती आपल्या पोटात काहीही लपवू शकणार नाही, असं तो म्हणाला. तेव्हापासून हा शाप आजही महिलांना लागू आहे, असं म्हटलं जातं.
advertisement
(सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18मराठी याची पुष्टी करत नाही. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देशही न्यूज18मराठीचा नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Mahabharat : महाभारत काळात कुंतीला दिलेला शाप, आजही भोगत आहेत सर्व महिला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement