Mahabharat Story : वीर्याने भरलेल्या पात्रातून द्रोणाचार्यांचा जन्म, विज्ञानात सांगितलंय हे कसं आहे शक्य
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mahabharat dronacharya birth story : वीर्याने भरलेल्या पात्रातून द्रोणाचार्यांचा जन्म झाल्याची कथा ही एक अशी घटना आहे ज्यावर विश्वास बसणार नाही. पण आता विज्ञान देखील अशा घटनांना मान्य करतं.
नवी दिल्ली : महाभारतातील अनेक लोकांचा जन्म बायोलॉजिकली झाला नव्हता, असं म्हणतात. त्यापैकीच एक म्हणजे आचार्य द्रोणाचार्य. त्यांचा जन्म वीर्याने भरलेल्या पात्रातून झाला असं सांगितलं जातं. या पात्राला काही लोक डोना, काही कलश तर काही कटोरी म्हणतात. द्रोणाचार्यांना प्रसिद्ध महर्षी भारद्वाज यांचे अनियोजित पुत्र म्हटलं जाते. त्यांनी आपलं वीर्य एका कलशात ठेवलं, ज्यातून द्रोणाचा जन्म झाला. मानवी शुक्राणू 40 वर्षे टिकवून ठेवल्यास त्यातून मूल जन्माला येऊ शकतं, असं विज्ञानही सांगत आहे.
महाभारताचे मुख्य पात्र आचार्य द्रोण हे महर्षी भारद्वाज यांचे पुत्र. अप्सरा पाहून महर्षि भारद्वाज मोहित झाले. महर्षी भारद्वाजांनी अप्सरा घृताची हिला गंगेत स्नान करताना पाहिलं आणि ते मोहीत झाले. त्यावेळी त्यांचं वीर्य स्खलित झालं ते त्यांनी यज्ञकलशात ठेवलं. यज्ञकलशांना द्रोण असंही म्हणतात. काही काळानंतर या वीर्यापासून एक बालक जन्माला आला, ते द्रोण होते. पुढे जेव्हा ते प्रसिद्ध आचार्य बनले तेव्हा त्यांना द्रोणाचार्य म्हटलं जाऊ लागलं. घृताचीला त्यांची आई म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
advertisement
द्रोणाचार्यांच्या जन्माचा दुसरा सिद्धांत असा आहे की जेव्हा भारद्वाज अप्सरा घृताचीवर मोहीत झाले तेव्हा त्यांचे तिच्याशी शारीरिक संबंध झाले. त्यांच्यापासून द्रोणाचा जन्म झाला. द्रोण नावाचा अर्थ पात्र किंवा बादली.
विज्ञान काय सांगतं?
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीन जिथं बरेच रिसर्च प्रसिद्ध केले आहेत. तिथल्या एका रिसर्चनुसार मानवी शुक्राणू 20 वर्षांहून अधिक काळ संरक्षित केले जातात. या साठवलेल्या शुक्राणूंपासून मुलं जन्माला येत असल्याच्या बातम्या आहेत. हे प्रयोग प्राण्यांपासून माणसांपर्यंत सर्वांवर केले गेले आहेत.
advertisement
जानेवारी ते डिसेंबर 1971 दरम्यान, 52 ते 53 वयोगटातील एका पुरुषाने दीर्घकालीन स्टोरेजसाठी त्याचे शुक्राणू फ्रिज केले. ते एका महिलेला दिले असता तिने 2 हेल्दी मुलींना जन्म दिला. एका अहवालात असंही म्हटले आहे जर मानवी शुक्राणू सुमारे 40 वर्षे (39 वर्षे, 10 महिने आणि 40 वर्षे, 9 महिने यांच्या दरम्यान) साठवले गेले, तर त्यात ICSI-IVF द्वारे मुलाला जन्म देण्याची क्षमता आहे.
Location :
Delhi
First Published :
January 18, 2025 4:38 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Mahabharat Story : वीर्याने भरलेल्या पात्रातून द्रोणाचार्यांचा जन्म, विज्ञानात सांगितलंय हे कसं आहे शक्य