तो दररोज गाडी घेऊन पेट्रोल पंपावर यायचा, Video पण बनवायचा आणि... व्यक्तीचं ‘सिक्रेट मिशन’ समजलं तर कपाळावर माराल हात

Last Updated:

पहिल्या नजरेत पाहणाऱ्याला हे सगळं विचित्रच वाटतं. एका व्यक्तीकडे एवढ्या गाड्या कशा? तो नक्की काय करतोय? त्याचं हे वागणं सुरुवातील सगळ्यांना संशयास्पद वाटलं. पण जेव्हा सत्य उघड झालं तेव्हा मात्र अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
मुंबई : एका तरुणाचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय. तो दररोज नवीन गाडी घेऊन एका विशिष्ट पेट्रोल पंपावर पोहोचतो… कधी स्कूटर, कधी स्पोर्ट्स बाईक, कधी चारचाकी कार. प्रत्येकवेळी वेगळी गाडी आणि वेगळा माणूस सोबत. पहिल्या नजरेत पाहणाऱ्याला हे सगळं विचित्रच वाटतं. एका व्यक्तीकडे एवढ्या गाड्या कशा? तो नक्की काय करतोय? त्याचं हे वागणं सुरुवातील सगळ्यांना संशयास्पद वाटलं. पण जेव्हा सत्य उघड झालं तेव्हा मात्र अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
खरंतर हा तरुण प्रेमात आकंठ बुडालेला आहे. तो पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणीच्या प्रेमात पडला. तिची एक झलक आणि स्माइल पाहण्यासाठी ही व्यक्ती दररोज त्या पेट्रोल पंपावर यायचा. तो सोबत आपल्या आजूबाजूचे लोक किंवा मित्रांना घेऊन यायचा. त्यांची गाडी आणून त्यामध्ये हा तरुण स्वत:च्या पैशाने पेट्रोल भरत असे.
एक हसू पाहण्यासाठी हा प्रेमवीर रोज वेगवेगळ्या वाहनांमध्ये पेट्रोल भरायला येतो. इतकंच नाही तर तो नेहमी तिलाच गाडी भरायला सांगतो, कारण तो फक्त तिच्याशीच संवाद साधायचा प्रयत्न करत असतो.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Ghaziabad (@realghaziabad)



advertisement
या सगळ्या "मिशन पेट्रोल प्रेम"मध्ये त्याचे मित्रही साथ देतायत. एकजण ड्रायव्हर बनतो, दुसरा कॅमेरा घेऊन व्हिडीओ शूट करतो. त्याच्या या प्रेम कहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला आहे.
या ‘मिशन’चा क्लायमॅक्सही तितकाच फिल्मी. व्हिडीओच्या शेवटी त्या तरुणीने प्रेमवीराकडे पाहून गोड हसू दिलं… आणि सोशल मीडियावर कोणी तरी एकदम लिहिलंच की "भाभी ने हां कर दी." हा खूपच मनोरंजक असा व्हिडीओ आहे. जो त्याच्या या युनिक गोष्टीमुळे व्हायरल झाला आहे.
मराठी बातम्या/Viral/
तो दररोज गाडी घेऊन पेट्रोल पंपावर यायचा, Video पण बनवायचा आणि... व्यक्तीचं ‘सिक्रेट मिशन’ समजलं तर कपाळावर माराल हात
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement