तरुणावर भुंकून फसला! कुत्रा माणसाला नाही माणूसच कुत्र्याला कचाकचा चावला; VIDEO VIRAL

Last Updated:

कुत्रा चावल्याचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्ही हे व्हिडीओ पाहिले असतील. पण सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून सगळ्यांना धक्का बसला आहे. कारण यात एक माणूस कुत्र्याला चावतो आहे.

फोटो : व्हिडीओ ग्रॅब
फोटो : व्हिडीओ ग्रॅब
नवी दिल्ली : आजवर तुम्ही कुत्रा माणसाला चावल्याची प्रकरणं पाहिली असतील. पण सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात चक्क माणूस कुत्र्याला चावला आहे. एका व्यक्तीवर कुत्रा भुंकला आणि हे त्या कुत्र्यावरच उलटलं. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
कुत्रा चावल्याचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्ही हे व्हिडीओ पाहिले असतील. पण सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून सगळ्यांना धक्का बसला आहे. कारण यात एक माणूस कुत्र्याला चावतो आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक कुत्रा जमिनीवर आहे. एका तरुणाने त्याला घट्ट पकडलं आहे. तरुण त्याच्या तोंडाला चावतो आहे. कुत्रा जिवाच्या आकांताने ओरडतो आहे. तरुणाने त्याला इतकं घट्ट पकडलं आहे की त्याला त्याच्या तावडीतून सुटताही येत नाही आहे.
advertisement
व्हिडीओच्या शेवटी एक व्यक्ती त्या तरुणाला खेचते. त्यावेळी त्या कुत्र्याची त्या तरुणाच्या तावडीतून सुटका होते. तो तिथून पळत सुटतो.
advertisement
व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. viral_ka_tadka या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत.
view comments
मराठी बातम्या/Viral/
तरुणावर भुंकून फसला! कुत्रा माणसाला नाही माणूसच कुत्र्याला कचाकचा चावला; VIDEO VIRAL
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement