बर्गर खाल्ला आणि तडफडून तडफडून गेला जीव; मृत्यूनंतर समोर आलं शॉकिंग कारण
- Published by:Priya Lad
Last Updated:
Man Died After Eating Burger : व्यक्ती जिने बार्बेक्युमध्ये हॅम्बर्गर खाल्ला होता. त्यानंतर 4 तासांनी तिला अस्वस्थ वाटू लागलं. त्याच्या मुलाला तो बाथरूमच्या बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याने उलट्याही केल्या होत्या. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्याचा मृत्यू झाला.
बर्गर म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. पण हाच बर्गर एका व्यक्तीसाठी जीवघेणा ठरला आहे. बर्गर खाल्ल्यानंतर 4 तासांनी त्या व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागलं. पोटात वेदना होऊ लागल्या, अतिसार, उलट्या झाल्या. त्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
न्यू जर्सीत राहणारी 47 वर्षांची ही व्यक्ती जिने बार्बेक्युमध्ये हॅम्बर्गर खाल्ला होता. त्यानंतर 4 तासांनी तिला अस्वस्थ वाटू लागलं. त्याच्या मुलाला तो बाथरूमच्या बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याने उलट्याही केल्या होत्या. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचं कारण अचानक अस्पष्ट असल्याचं सांगण्यात आलं.
advertisement
रिपोर्टनुसार व्यक्तीला पोटदुखी, अतिसार आणि उलट्या होत होत्या. त्याच्या मृत्यूनंतर घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यांवरून त्याला अॅलर्जी झाल्याचं दिसून आलं. त्याच्या पत्नीने सांगितलं की त्या उन्हाळ्यात त्याच्या पायाभोवती 12-13 टिक चावल्याचं निशाण होतं. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की या चावण्याच्या खुणा प्रत्यक्षात लोन स्टार टिक्सच्या अळ्यांमुळे होत्या, ज्यामुळे काही प्रकरणांमध्ये अल्फा-गॅल सिंड्रोम होऊ शकतो. टिक्स विविध रोग पसरवतात. यातील सर्वात धोकादायक म्हणजे अल्फा-गॅल सिंड्रोम.
advertisement
हे अल्फा-गॅल सिंड्रोम काय आहे?
अल्फा-गॅल सिंड्रोम ही विशिष्ट टिक्सच्या लाळेमुळे होणारी ऍलर्जी आहे. ती रोगप्रतिकारक शक्तीला सस्तन प्राण्यांच्या मांसामध्ये आढळणाऱ्या अल्फा-गॅल नावाच्या विशिष्ट साखरेवर अतिरेकी प्रतिक्रिया देण्यास प्रवृत्त करते. हा सिंड्रोम असलेल्या लोकांना लाल मांस, काही औषधं, पर्सनल केअर प्रोडक्ट आणि वैद्यकीय उपचारांमुळे जीवघेणी ऍलर्जी होऊ शकते. ऍलर्जीच्या प्रतिक्रियेची लक्षणं कालांतराने दिसून येतात, ज्यामुळे अनेक लोकांना त्यांची स्थिती ओळखणं कठीण होतं. या प्रकरणात व्यक्तीने मृत्यूच्या दोन आठवड्यांआधीही स्टीक डिनर खाल्लं होतं आणि काही तासांतच तो गंभीर आजारी पडला.
advertisement
या अॅलर्जीची लक्षणं कोणती?
अल्फा-गॅल सिंड्रोमची लक्षणं लाल मांस खाल्ल्यानंतर आठ तासांनंतर सुरू होऊ शकतात. सौम्य प्रतिक्रियांमध्ये लाल पुरळ, तोंडात खाज सुटणं किंवा मुंग्या येणं, डोळे, ओठ आणि चेहऱ्याभोवती सूज, तसंच पोटदुखी किंवा उलट्या यांचा समावेश असू शकतो.
2024 सालची ही घटना. जर्नल ऑफ ऍलर्जी अँड क्लिनिकल इम्युनोलॉजी मेडिसीनमध्ये हे संशोधन प्रकाशित झाली आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 23, 2025 9:19 PM IST


