Shocking! आईच्या दुधात 'विष', भारतातील 6 जिल्ह्यांतील अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर
- Published by:Priya Lad
Last Updated:
Cancer Causing Uranium Found In Breast Milk : अभ्यासातून असं दिसून आलं आहे की जवळजवळ 70% मुलांना अशा पातळीचा सामना करावा लागला ज्यामुळे गंभीर आजाराचे धोके निर्माण होऊ शकतात.
आईचं दूध म्हणजे अमृत... बाळाचा पहिला आणि सर्वात सुरक्षित असा आहार. पण आता आईच्या दुधाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आईच्या दुधात कॅन्सरसाठी कारणीभूत ठरणारा घटक आढळला आहे. भारतातील 6 जिल्ह्यात आईच्या दुधाच्या नमुन्यात हे घटक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.यामुळे नवजात बालकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. नेचर जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
जर्नल नेचरमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. हा अभ्यास ऑक्टोबर 2021 ते जुलै 2024 दरम्यान महावीर कर्करोग संस्थेचे डॉ. अरुण कुमार आणि प्राध्यापक अशोक घोष यांच्या नेतृत्वात नवी दिल्लीतील एम्सचे डॉ. अशोक शर्मा यांच्या सहकार्याने करण्यात आला. अभ्यासात असं दिसून आलं आहे की बिहार राज्यातील सहा जिल्ह्यांमधील प्रत्येक स्तनपान करणाऱ्या महिलेच्या दुधात युरेनियम आढळून आलं आहे.
advertisement
अभ्यासात काय आढळलं?
या अभ्यासाअंतर्गत भोजपूर, समस्तीपूर, बेगुसराय, खगरिया, कटिहार आणि नालंदा येथील 17 ते 35 वयोगटातील 40 महिलांच्या आईच्या दुधाचे नमुने तपासण्यात आले. धक्कादायक म्हणजे सर्व नमुन्यांमध्ये युरेनियम (U238) आढळून आलं. कोणत्याही देशाने किंवा संस्थेने आईच्या दुधात युरेनियमची सुरक्षित मर्यादा ठरवलेली नाही, म्हणजेच कोणतंही प्रमाण वैज्ञानिकदृष्ट्या सुरक्षित मानलं जात नाही.
advertisement
अभ्यासातून असं दिसून आलं आहे की जवळजवळ 70% मुलांना अशा पातळीचा सामना करावा लागला ज्यामुळे गंभीर आजाराचे धोके निर्माण होऊ शकतात. तज्ज्ञ म्हणतात की सर्वात मोठा धोका अशा मुलांसाठी आहे ज्यांचे अवयव अद्याप विकसित होत आहेत. त्यांचं शरीर जड धातू लवकर शोषून घेतं आणि त्यांच्या कमी वजनामुळे, अगदी कमी प्रमाणात देखील गंभीर नुकसान होऊ शकते.
advertisement
युरेनियम आईच्या दुधात पोहोचलं कसं?
या अभ्यासाचे सह-लेखक एम्सचे डॉ. अशोक शर्मा म्हणाले, युरेनियम अन्नसाखळीत प्रवेश करत आहे आणि कर्करोग, न्यूरोलॉजिकल रोग आणि बाल विकासावर परिणाम करत आहे ही गंभीर चिंतेची बाब आहे. युरेनियम पाण्यात कुठून पोहोचलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आम्हाला स्रोत माहित नाही. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण देखील कारणाचा तपास करत आहे.
advertisement
पण हा धोका असला तरी मातांनी आपल्या बाळांना स्तनपान थांबवू नये. बाळाच्या प्रतिकारशक्ती आणि विकासासाठी आईचं दूध आवश्यक आहे आणि त्याला पर्याय नाही. ते फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच थांबवावं, असं शास्त्रज्ञांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
view commentsLocation :
Bihar
First Published :
November 23, 2025 8:16 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Shocking! आईच्या दुधात 'विष', भारतातील 6 जिल्ह्यांतील अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर


