80 कोटींची लॉटरी लागली, उत्साहात गर्लफ्रेंडसोबत अख्खी रात्र घालवली, दुसऱ्या दिवशी तरुण...

Last Updated:

एका रात्रीत तो करोडपती झाला, गर्लफ्रेंडसोबत त्याने रात्र घालवली. मात्र, दुसऱ्या दिवशी जेम्स भल्या पहाटे रस्त्यावर दिसला. तो ज्या अवस्थेत रस्त्यावर होता ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.

लॉटरीनंतर रात्री गर्लफ्रेंडसोबत पार्टी आणि सकाळी...
लॉटरीनंतर रात्री गर्लफ्रेंडसोबत पार्टी आणि सकाळी...
नवी दिल्ली :  एखाद्याला लॉटरी लागली की साहजिकच त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. आनंदाला पारावर राहत नाही. असाच एक तरुण ज्याला काही हजार, लाख नव्हे तर तब्बल 80 कोटी रुपयांची लॉटरी लागली. हा तरुण इतका आनंदी झाला, त्याला इतका उत्साह चढला की त्याने त्यादिवशीची संपूर्ण रात्र गर्लफ्रेंडसोबत घालवली. दुसऱ्या दिवशी हा तरुण रस्त्यावर अशा अवस्थेत दिसला की तुम्ही विचारही केला नसेल.
ब्रिटनमधील कार्लिले इथं राहणारा 20 वर्षीय जेम्स क्लार्कसन ज्याने ख्रिसमसच्या वेळी नॅशनल लॉटरीमध्ये 120 पौंड म्हणजेच 12,676 रुपये जिंकले. यानंतर त्याने पुन्हा एकदा लॉटरी जिंकली आणि 7.5 दशलक्ष पौंड म्हणजेच सुमारे 80 कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकला.  विशेष म्हणजे जेम्सने ख्रिसमसच्या दिवशी 12000 रुपयांची लॉटरी जिंकली होती आणि त्यासोबतच त्याने हे तिकीट खरेदी केलं होतं. जॅकपॉट जिंकल्याच्या बातमीनंतर जेम्स खूप खूश झाला आणि म्हणतो की हे अगदी स्वप्नासारखं होतं.
advertisement
लॉटरी जिंकल्याची बातमी आली तेव्हा जेम्स त्याच्या गर्लफ्रेंडसोबत होता आणि त्याने कुटुंबासोबत खाऊन पिऊन सेलिब्रेशन केलं. एका रात्रीत तो करोडपती झाला, गर्लफ्रेंडसोबत त्याने रात्र घालवली. मात्र, दुसऱ्या दिवशी जेम्स भल्या पहाटे रस्त्यावर दिसला. तो ज्या अवस्थेत रस्त्यावर होता ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.
advertisement
करोडपती झालेला जेम्स रस्त्यातील नाले साफ करत होता. जेम्स नाल्यांमधील तुंबलेले पाणी काढण्याचं काम करतो, हे त्याचं रोजचं काम. लॉटरी जिंकल्यानंतरही त्याने आपलं हे काम सोडलं नाही. कडाक्याच्या थंडीत तो नाले साफ करायला गेला. द मेट्रोच्या रिपोर्टनुसार, जेम्स म्हणतो की तो खूप लहान आहे, त्यामुळे त्याला काम थांबवायचं नाही आणि करोडो रुपयांचा मालक असूनही त्याला हवेत उडायचं नाही.
view comments
मराठी बातम्या/Viral/
80 कोटींची लॉटरी लागली, उत्साहात गर्लफ्रेंडसोबत अख्खी रात्र घालवली, दुसऱ्या दिवशी तरुण...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement