अरे बापरे! व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हे काय अडकलं? डॉक्टरही घाबरले, ऑपरेशनसाठी बोलावली फायर ब्रिगेड
- Published by:Priya Lad
Last Updated:
Metal washer stuck in private part : 3 दिवस त्याने स्वतःच वॉशर प्रायव्हेट पार्टमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण तो काही निघाला नाही. उलट या प्रक्रियेदरम्यान त्याच्या गुप्तांगाला दुखापत झाली आणि सूज येऊ लागली.
तिरुवनंतपुरम : 46 वर्षांचा पुरुष ज्याच्या प्रायव्हेट पार्ट एका मेटल वॉशरमध्ये अडकला होता. ही व्यक्ती रुग्णालयात आली. त्याची अवस्था पाहून डॉक्टरही शॉक झाले. डॉक्टरांनाही वॉशर काढायला जमलं नाही. शेवटी या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमधून वॉशर काढण्यासाठी अग्निशमन दलाला बोलावलं. केरळमधील ही अजब प्रकरण आहे.
कासरगोड जिल्ह्यातील कान्हंगड येथील ही घटना. 46 वर्षीय व्यक्तीच्या गुप्तांगाभोवती धातूचा वॉशर अडकला. दीड इंच व्यासाचं हे वॉशर. त्यामुळे लघवी करतानाही त्याला त्रास होत होता, वेदना होत होत्या. 3 दिवस त्याने स्वतःच वॉशर प्रायव्हेट पार्टमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण तो काही निघाला नाही. उलट या प्रक्रियेदरम्यान त्याच्या गुप्तांगाला दुखापत झाली आणि सूज येऊ लागली.
advertisement
अखेर त्याने मंगळवारी रात्री कन्हानगड येथील जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी वॉशर प्रायव्हेट पार्टमधून काढण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्टरांनाही काही ते जमलं नाही. परिस्थिती अधिक गंभीर होत होती. तेव्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार कन्हानगड अग्निशमन केंद्रातील अग्निशमन आणि बचाव पथकाला माहिती दिली. व्यक्तीला अग्निशमन केंद्रात जायला सांगितलं.
advertisement
अग्निशमन दलातील अधिकारी मुकेश ईपी यांनी न्यूज18ला सांगितलं, 'डॉक्टरांनी त्याला अग्निशमन केंद्रात जाण्याचा सल्ला दिला असला तरी आमच्या पथकाने त्याला रुग्णालयात थांबण्यास सांगितलं. कारण परिस्थिती खूपच धोकादायक आहे आणि त्याला वैद्यकीय देखरेखीची आवश्यकता असू शकते'
अग्निशमन अधिकारी के एम शिजू यांच्या नेतृत्वात बचाव पथक ऑपरेशन सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व साधनांसह रुग्णालयात पोहोचलं. घर्षण होऊन वॉशरमधून उष्णता निर्माण होत असल्याने ते थंड ठेवण्यासाठी पथकाला त्या भागावर सतत पाणी ओतावं लागलं. कॉर्डलेस रोटरी टूल वापरून ग्राइंडरने 90 मिनिटांपेक्षा जास्त काळ कष्ट करावे लागले. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास, त्यांनी वॉशरच्या दोन्ही बाजूंनी कापला.
advertisement

रेस्क्यू पथक ज्यामध्ये लिनेश, शिबिन आणि अजित यांचा समावेश होता, त्यांनी सांगितल्यानुसार, हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक ऑपरेशनपैकी एक होतं.
आता प्रश्न अस की वॉशर प्रायव्हेट पार्टमध्ये अडकलं कसं? तर त्या व्यक्तीने सांगितल्यानुसार तो दारू प्यायला होता. काही पेग्स नंतर तो दारूच्या नशेत असताना काही अज्ञात व्यक्तींनी वॉशर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घातलं. पण त्याने दिलेलं हे कारण बचाव पथकाला मात्र पटलेलं नाही.
Location :
Kerala
First Published :
March 28, 2025 3:08 PM IST
मराठी बातम्या/Viral/
अरे बापरे! व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हे काय अडकलं? डॉक्टरही घाबरले, ऑपरेशनसाठी बोलावली फायर ब्रिगेड