Human Washing Machine : 15 मिनिटांत अंघोळ' जपानची 'ह्युमन वॉशिंग मशीन' बाजारात, किंमत आणि फीचर्स पाहिलंत का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ही मशीन एका हाय-टेक स्पा पॉड (High-Tech Spa Pod) प्रमाणे कार्य करते, जी काही मिनिटांतच तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत स्वच्छ करते.
मुंबई : जपान (Japan) हा देश नेहमीच आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखला जातो, जो मानवी जीवन अधिक सुलभ आणि आरामदायक बनवतो. रोजच्या कामातून मिळणारा थकवा आणि ताण कमी करण्यासाठी अनेक जपानी उत्पादने बाजारात येतात. आता जपानच्या सायन्स इंक. (Science Inc.) या कंपनीने एक अशी मशीन लॉन्च केली आहे, जिला "मिराई ह्युमन वॉशिंग मशीन" (Mirai Human Washing Machine) असे नाव देण्यात आले आहे.
ही मशीन एका हाय-टेक स्पा पॉड (High-Tech Spa Pod) प्रमाणे कार्य करते, जी काही मिनिटांतच तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत स्वच्छ करते. ही मशीन सर्वप्रथम ओसाका येथील वर्ल्ड एक्सपोमध्ये (World Expo) प्रदर्शित करण्यात आली होती आणि आता ती जपानच्या बाजारात खरेदीसाठी उपलब्ध झाली आहे.
'या' पॉडमध्ये अंघोळ कशी होते?
या अत्याधुनिक मशीनमध्ये व्यक्ती एका पॉडच्या आतमध्ये प्रवेश करतो आणि एका आरामदायक सीटवर मागे टेकून बसतो. पॉडचा दरवाजा बंद होताच, मशीन आपले काम आपोआप सुरू करते.
advertisement
ही मशीन मायक्रोबबल्सचा वापर करून शरीराला हळूवारपणे स्वच्छ करते. हे अतिसूक्ष्म बबल्स त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये (Pores) जातात आणि तेल, घाण तसेच मृत त्वचा (Dead Skin) काढून टाकतात. ही तकनीक आधीपासून जपानच्या स्पा आणि सौंदर्य सलूनमध्ये वापरली जाते.
मशीन मायक्रोबबल्सने शरीर धुतल्यानंतर, पुन्हा त्याच बबल्सचा वापर करून धुण्याची प्रक्रिया पूर्ण करते आणि सर्वात शेवटी आत बसलेल्या व्यक्तीला सुकवते (Dry) देखील!
advertisement
आरामदायी अनुभव: या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मशीन हलके संगीत (Light Music) वाजवते, ज्यामुळे व्यक्तीला अत्यंत आरामदायी अनुभव मिळतो. कंपनीच्या प्रवक्त्या सचिको माएकुरा यांच्या म्हणण्यानुसार, ही मशीन केवळ शरीरच नाही, तर "आत्म्यालाही स्वच्छ" करते.
पूर्ण अंघोळ आणि सुकवण्याचे काम केवळ 15 मिनिटांत पूर्ण होते आणि विशेष म्हणजे, या दरम्यान व्यक्तीला स्वतःहून काहीही करण्याची आवश्यकता नसते.
advertisement
भूतकाळातील प्रेरणा आणि भविष्यातील तंत्रज्ञान
या मशीनची पहिली प्रेरणा 1970 च्या ओसाका एक्स्पोमधून मिळाली होती, जिथे सैनीओ इलेक्ट्रिकने (Sanyo Electric - आजची पॅनासोनिक) पहिल्यांदा अशी मशीन दाखवली होती. सायन्स इंक. चे चेअरमन यासुआकी अओयामा यांनी ही मशीन लहानपणी पाहिली होती आणि आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी ती पुन्हा विकसित केली आहे. 2025 च्या ओसाका वर्ल्ड एक्स्पोमध्ये ही मशीन प्रचंड लोकप्रिय झाल्यानंतर ती बाजारात आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
advertisement
हा पॉड सुमारे 8.2 फूट लांब आणि 8.5 फूट उंच आहे, ज्यामुळे व्यक्ती यात आरामात झोपू शकते.
पॉडमध्ये असलेले सेन्सर्स (Sensors) व्यक्तीची हार्टबीट (Heartbeat) आणि इतर महत्त्वाची शारीरिक चिन्हे (Vital Signs) तपासत असतात, जेणेकरून सुरक्षितता आणि आराम दोन्ही सुनिश्चित राहील.
आता या मशीनची सर्वात महत्त्वाची गोष्ट किंमत रिपोर्टनुसार, ही मशीन बाजारात सुमारे 60 मिलियन येन (सुमारे 3,85,000 अमेरिकन डॉलर्स / 3.2 कोटी भारतीय रुपये) मध्ये लॉन्च केली जात आहे.
advertisement
या प्रचंड किमतीमुळे, ही मशीन सामान्यतः घरगुती वापरासाठी नसून, लक्झरी स्पा (Luxury Spas), थीम पार्क, ओन्सेन (जपानी हॉट स्प्रिंग सेंटर्स), उच्च श्रेणीचे हॉटेल्स आणि हेल्थ रिसॉर्ट्ससाठी तयार करण्यात आली आहे.
कंपनीने सध्या फक्त 40 ते 50 युनिट्स तयार करण्याचा निर्णय घेतला आहे आणि प्रत्येक युनिट हाताने बनवले जाणार आहे. एका जपानी हॉटेल चेनने पहिले युनिट खरेदी केले असून, आणखी 5 ते 8 युनिट्स आरक्षित (Reserved) झाली आहेत.
advertisement
भविष्यातील केअर टेक्नॉलॉजी
view commentsही मशीन केवळ अंघोळीसाठी नाही, तर जपानच्या वाढत्या वृद्ध लोकसंख्येसाठी तयार केल्या जाणाऱ्या भविष्यकालीन ऑटोमेटेड केअर सिस्टीमचे (Automated Care System) हे पहिले पाऊल आहे. भविष्यात अशा मशीन्समुळे वृद्धांना सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने अंघोळ करणे शक्य होईल. मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यास, याचे स्वस्त घरगुती मॉडेलही लॉन्च केले जाऊ शकते, असे कंपनीने म्हटले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2025 10:14 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Human Washing Machine : 15 मिनिटांत अंघोळ' जपानची 'ह्युमन वॉशिंग मशीन' बाजारात, किंमत आणि फीचर्स पाहिलंत का?


