अंतराळातून पृथ्वी आजपर्यंत कधीच अशी दिसली नाही, NASA ने शेअर केला खास VIDEO
- Published by:sachin Salve
Last Updated:
नासाच्या यानाने अंतराळातून निळ्याशार पृथ्वीचा व्हिडिओ तयार केला आहे. त्याला ब्लू मार्बल असं म्हटलं जातंय.
मुंबई : अंतराळातल्या ग्रहताऱ्यांच्या नोंदी आणि निरीक्षणं नोंदवणं हे माणसाचं जुनं काम आहे. भारतीय संस्कृतीतील ऋषीमुनींनी आकाशातील असंख्य निरीक्षणं करून एक खगोलशास्त्रच निर्माण केलं. आधुनिक जगातही विज्ञानाने संशोधनाच्या आधारे चंद्रापर्यंत मजल मारली. या क्षेत्रात आघाडीवर असलेली अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा कायम नवनवे प्रयोग करत असते. नासाच्या यानाने अंतराळातून निळ्याशार पृथ्वीचा व्हिडिओ तयार केला आहे. त्याला ब्लू मार्बल असं म्हटलं जातंय.
NASA आणि Firefly Aerospace यांनी यांनी चंद्राच्या दिशेने Blue Ghost Lunar Lander हे यान पाठवलं आहे आणि आपल्या प्रवासादरम्यान या यानाने अंतराळातील विलोभनीय दृश्य कॅमेरात कैद केली आहेत. या लँडरने पृथ्वीचा एक सुंदर व्हिडिओ तयार केला आहे. त्यात आपली धरणीमाता निळ्या-पांढऱ्या संगमरवराच्या गोळ्यासारखी दिसत आहे. NASA ने या व्हिडिओलाही 'ब्लू मार्बल' असं नवा दिलं आहे.
advertisement
Everybody, wave!@Firefly_Space’s Blue Ghost lunar lander caught Earth on video as the lander continued its journey to the Moon. Blue Ghost is expected to land on March 2, delivering 10 NASA science investigations to the Moon's surface. pic.twitter.com/KoRb549dTp
— NASA (@NASA) January 24, 2025
advertisement
अंतराळातून पहिल्यांदा 1972 मध्ये पृथ्वीचं असं विलोभनीय दृश्य दिसलं होतं. त्या वेळी NASA च्या Apollo 17 मिशनने ओरिजनल 'ब्लू मार्बल' फोटो काढला होता. 2002 मध्ये NASA ने अपडेटेड व्हर्जन जारी करून त्याला 'Blue Marble: Next Generation' असं नाव दिलं होतं.'
Blue Ghost ने पृथ्वीचा उत्तम फोटो पाठवला आहे. या फोटोतून केवळ पृथ्वीचं सौंदर्यच नाही तर वैज्ञानिक प्रगतीही दिसून येते. या लँडरवर बसवलेल्या हाय-टेक कॅमेरातून हा फोटो काढण्यात आला आहे.
advertisement
NASA चा एक प्रवक्ता म्हणाला, ' हा फोटो केवळ वैज्ञानिक दृष्टिनेच महत्वपूर्ण नाही तर, आपला ग्रह किती विशेष आहे याचीही आठवण हा फोटो आपल्याला करून देतो. या फोटोमुळे अंतराळात आपण कुठे आहोत हे पण दिसत आहे.'
काय आहे Blue Ghost मिशन?
Blue Ghost एक लँडर आहे जो चंद्रावर उतरवण्यासाठी डिझाईन केलेला आहे. त्याला Firefly Aerospace ने NASA च्या Commercial Lunar Payload Services (CLPS) प्रोग्रॅम अंतर्गत डिझाईन केलंय. ब्लू घोस्ट मिशनचं उद्दिष्ट 10 NASA सायन्स इन्वेस्टिगेशन्सना चंद्रावर पोहोचवण्याचं आहे.
advertisement
चंद्राच्या पृष्ठभागावरील वैज्ञानिक संशोधन पुढे नेणं आणि भविष्यातील माणसाच्या मिशन्ससाठी आवश्यक माहिती गोळा करण्यात हे ब्लू घोस्ट मिशन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हा लँडर 2 मार्च 2025 ला चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे पोहोचणं अपेक्षित आहे.
चंद्रावर यान उतरवणं तसं सोपं काम नाही. गेल्या काही वर्षांत अनेक खासगी कंपन्यांनी त्यांची यानं चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचे प्रयत्न केले होते. पण सगळ्याच कंपन्यांना यश आलं नाही. त्यामुळे नासाचं हे यान चंद्रावर पोहोचतं का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 27, 2025 11:53 PM IST


