Pahalgam Video Viral : इथं येऊ नका! पहलगाममध्ये गेलेल्या मराठी कुटुंबाने हल्ल्याआधी पोस्ट केला होता VIDEO
- Published by:Priya Lad
Last Updated:
Pahalgam video viral : पहलगाम जिथं दहतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्याच्या ठिकाणीच काही दिवसांआधी गेलेलं एक मराठी कुटुंब, ज्यांनी इथं येऊ नका असा सल्ला देत व्हिडीओ पोस्ट केला होता. या कुटुंबाचा व्हिडीओ आता व्हायरल होतो आहे.
जम्मू-काश्मीर : पहलगाममधील हल्ल्याने भारतासह संपूर्ण जग हादरलं आहे. हल्ल्यानंतर इथले वेगवेगळे व्हिडीओ समोर येत आहेत. अनेकांनी आपले थरारक अनुभवही सांगितले आहेत. हल्ल्यानंतर इथं जाण्याचं धाडस आता कुणीच करणार नाही. दरम्यान हल्ल्याच्या काही दिवसांआधी याच ठिकाणी गेलेल्या एका मराठी कुटुंबाने इथं येऊ नका, असं आधीच सांगितलं होतं. या कुटुंबाचा व्हिडीओ आता व्हायरल होतो आहे.
दक्षिण काश्मीरमधील पहलगाम हे ठिकाण पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. याला मिनी स्वित्झर्लंड असंही म्हणतात. सध्या उन्हाळ्यामुळे हजारो पर्यटक इथं भेटी देत होते. एक मराठी कुटुंब इथं गेलं होतं, 4 एप्रिल 2025 रोजी त्यांनी इथून एक व्हिडीओ पोस्ट केला होता.
@md_tours या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये म्हटलं आहे, 'हा व्हिडिओ 4 एप्रिल 2025 चा असून आमच्या पर्यटकांसोबत मी काढला होता. या ठिकाणी जाण्यासाठी इतका त्रास सहन करावा लागला होता आम्हाला आणि वर जाऊन पण भ्रमनिरास झाला होता.'
advertisement
'ज्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 27 लोकं मरण पावले आहेत ते अगदी हेच ठिकाण आहे. ज्या मृतदेहाचा फोटो व्हायरल होतो तो एकदम इथलाच आहे. विशेष म्हणजे इथं एकही पोलीस अथवा आर्मीचा जवान तैनात नव्हता हे तेव्हा मला दिसलं होतं. इथं बंदोबस्त का नाही या गोष्टीचं विशेष देखील वाटलं होतं. बहुतेक वरच्या भागात डोंगरावर वगैरे आपलं सैन्य तैनात असेल असं वाटलं होतं. नेमकी हीच संधी साधून त्या हरामखोर दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे.'
advertisement
या व्हिडीओत हे लोक इथपर्यंत येण्यासाठी किती त्रास सहन करावा लागला, इतका त्रास सहन करून आल्यानंतर तसं इथं पाहण्यासारखं काही नाही असं सांगतात. एक पर्यटक इथं आयुष्यात पुन्हा कधी येणार नाही, असं स्पष्ट सांगतो. तर व्हिडीओ बनवणारा तरुण, इथं न येण्याचा सल्ला देतो.
advertisement
मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास जम्मू काश्मीरच्या पहलगाम परिसरात मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. पोलिसांच्या वेशात आलेल्या काही दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना लक्ष्य केलं. आठ ते दहा दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात आले होते.
दोन तुकड्यांमध्ये आलेल्या दहशवाद्यांनी ठरवून हिंदू बांधवांना लक्ष्य केल्याचे प्राथमिक माहितीत समोर येत आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी आधी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारला. नाव आणि धर्माची माहिती करून घेतल्यानंतर त्यांनी पडताळणीसाठी काही पर्यटकांना पँट काढायला लावली. तसंच काही जणांना कलमा म्हणायला सांगितला.
advertisement
दहशतवाद्यांनी जवळपास 20 ते 25 मिनिटं अंधाधुंद गोळीबार केला. हल्ल्याचे साक्षीदार असलेल्या अनेकांनी अतिशय थरारक क्षणांचा अनुभव सांगितला आहे. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना टीआरएफ (The Resistance Front) ने घेतली आहे.
view commentsLocation :
Jammu and Kashmir
First Published :
April 25, 2025 9:44 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Pahalgam Video Viral : इथं येऊ नका! पहलगाममध्ये गेलेल्या मराठी कुटुंबाने हल्ल्याआधी पोस्ट केला होता VIDEO


