पोपट हरवला, लावले शहरभर पोस्टर; शोधण्याऱ्यासाठी ठेवलं 10 हजारांचं बक्षीस
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
माणूस बेपत्ता झाल्यावर त्याची बेपत्ता झाल्याची तक्रार केली जाते त्याचप्रमाणे या पाळीव प्राण्यांचीही लोक करतात. एक घटना समोर आलीय ज्यामध्ये एक पोपट हरवला तर त्याला शोधण्यासाठी चक्क शहरभर पोस्टर लावण्यात आले.
नवी दिल्ली, 03 ऑगस्ट : जगभरातील लोक अनेक वेगवेगळे प्राणी, पक्षी पाळतात. त्यांना खूप जीव लावत त्यांची काळजी घेतात. त्यामुळे पाळीव प्राणी, पक्षीदेखील त्यांच्या कुटुंबाचा भाग होऊन जातात. अनेकदा हे पाळीव जीव बेपत्ता होतात. जसा माणूस बेपत्ता झाल्यावर त्याची बेपत्ता झाल्याची तक्रार केली जाते त्याचप्रमाणे या पाळीव प्राण्यांचीही लोक करतात. एक घटना समोर आलीय ज्यामध्ये एक पोपट हरवला तर त्याला शोधण्यासाठी चक्क शहरभर पोस्टर लावण्यात आले. ही घटना सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
एका कुटुंबाने पोपट हरवला म्हणून शहरभर पोस्टर लावले. ही घटना मध्ये प्रदेशातून समोर आली आहे. मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील एका कुटुंबानेही कोणत्याही माणसासाठी नव्हे तर आपल्या पोपटाचे पोस्टर शहरभर लावले आहेत. पोपट शोधून आणणाऱ्याला 10 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे या पोस्टर्सवर लिहिले आहे. हे पोस्टर आणि या कुटुंबाचे पोपट प्रेम सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
advertisement
दामोह येथील सोनी कुटुंबाचा पोपट 1 ऑगस्ट रोजी उडून गेला होता, मात्र तो घरी परतलाच नाही. त्या दिवसापासून कुटुंबीय चिंतेत असून इकडे तिकडे त्याचा शोध घेत आहेत. या पोपटाच्या शोधात कुटुंबीयांनीही ई-रिक्षातून घोषणा देण्यास सुरुवात केली आहे. तो पोपट शोधण्यासाठी ही ई-रिक्षा रेकॉर्डिंग वाजवत शहरात फिरत आहे. . या पोस्टर्सवर पोपटाच्या चित्रासह लिहिले आहे की, पोपट शोधणाऱ्याला 10 हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाईल.
advertisement
इंदिरा कॉलनीतील नंदकिशोर सोनी यांच्याकडे 2 वर्षांपासून हा पोपट होता मात्र तो अचानक उडून गेला. घरच्यांना तो परत येईल याची खात्री होती पण तो आला नाही. व्यथित झालेल्या सोनी कुटुंबीयांनी पोपटाची शोध मोहिम सुरु केली. कुटुंबातील दीपक सोनी यांनी सांगितलं की, त्यांचे वडील पोपटाला रोज फिरायला घेऊन जायचे. अशातच ते फिरायला गेले होते की पोपटाला पाहून कुत्रे भुंकायला लागले आणि तो घाबरून पळून गेला. आधी तो झाडावर बसला आणि मग तिथूनही उडून गेला. दीपकनं सांगितलं की, त्याच्या पोपटाला नीट कसं उडायचं हेही कळत नाही, त्यामुळे त्याला भीती वाटत आहे. आम्ही 10,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, जर ते सापडलेल्या व्यक्तीनं आणखी काही मागितले तर आम्ही तेही देऊ.
advertisement
दरम्यान, यापूर्वीही पाळीव प्राणी, पक्षी हरवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. लोक आपल्या लाडक्या जीवांना खूप जीव लावतात त्यांच्यासाठी काहीही करतात. त्यामुळे हरवल्यानंतर त्यांना शोधण्यासाठी अनेक मोठी रक्कमही द्यायला तयार असतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 03, 2023 8:33 AM IST









