Viral Video: व्यक्तीने मागवला स्प्रिंग रोल, आत निघालं जिवंत गांडूळ; शेवटी धक्कादायक सत्य आलं समोर
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
जगभरात अनेक लोक खाण्याचे शौकिन असतात. निरनिराळे पदार्थ खायला अनेकांना आवडतं. लोक आवर्जुन जाऊन बाहेरचे नवीन पदार्थ ट्राय करतात.
नवी दिल्ली, 02 ऑगस्ट : जगभरात अनेक लोक खाण्याचे शौकिन असतात. निरनिराळे पदार्थ खायला अनेकांना आवडतं. लोक आवर्जुन जाऊन बाहेरचे नवीन पदार्थ ट्राय करतात. मात्र बाहेरचं खाणं जेवढं टेस्टी तेवढंच रिस्कीही आहे. बऱ्याचदा खाण्यात विचित्र गोष्टी निघतात. सोशल मीडियावर अशा घटना सतत समोर येत असतात. अशीच घटना समोर आली असून एका व्यक्तीच्या खाण्यात चक्क गांडूळ आढळलं. तेही जीवंत.
बाहरे खात असाल तर तुम्हालाही कधीतरी वाईट अनुभव आलेच असतील. कधी खाण्याला चव नसते तर कधी स्वच्छता नसते, अन्नात काहीतरी निघतं. अशी प्रकरणे वारंवार समोर येत असतात. सध्या समोर आलेल्या घटनेत एक व्यक्ती रेस्टॉरंटमध्ये खायला गेला होता. त्यानं स्प्रिंग रोल मागवला मात्र अर्धा खाल्यानंतर त्याला जे दिसलं ते धक्कादायक होतं. याचा व्हिडीओही व्यक्तीनं शेअर केला आहे.
advertisement
व्यक्तीच्या स्प्रिंग रोलमधून जिवंत गांडूळ बाहेर पडताना दिसलं. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्या व्यक्तीने हा अनुभव धक्कादायक असल्याचं सांगितलं. तसंच या घटनेची माहिती आरोग्य विभागाला दिल्याचेही लिहिलं आहे. मात्र हा व्हिडिओ पाहताच त्या व्यक्तीचा घाणेरडा हेतू लोकांच्या लक्षात आला. जर रोलमध्ये हे गांडूळ निघालं असतं तर ते जिवंत राहिलं नसतं. रोलसोबत तळताना त्याचाही जीव गेला असता. व्यक्तीची ही चूक लोकांनी पकडली आणि व्हिडीओवर कमेंटवर करत त्याच्यावर टोलेबाजी केली.
advertisement
advertisement
अनेक लोक असं कृत्य रेस्टॉरंची बदनामी करण्यासाठी करतात तर काही जण पैसे वाचवूण पुन्हा खण्यासाठी करतात. जेणेकरुन त्यांना पुन्हा दुसरा पदार्थ दिला जाईल. लोक कधी कधी मुद्दामून वाईट हेतूनं या गोष्टी करतात.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 02, 2023 1:55 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Viral Video: व्यक्तीने मागवला स्प्रिंग रोल, आत निघालं जिवंत गांडूळ; शेवटी धक्कादायक सत्य आलं समोर








