Pune Andekar : 'माझ्या आईला तुम्ही...' तुरूंगात असलेल्या सोनालीचा विजय, वनराजच्या मुलीचा आनंद गगनात मावेना! म्हणाली 'सत्याचाच विजय होतो...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune PMC Election Sonali Andekar Daughter : सोनाली आणि लक्ष्मी दोघी सध्या तुरूंगात असल्याने आता तुरूंगात देखील गुलाल उधळला गेला आहे. आई विजयी झाल्यानंतर वनराजच्या लेकीला आनंद गगनात मावेना झाला.
Pune Andekar News : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये भवानी पेठ परिसरात मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. प्रभाग क्रमांक 23 मधून आंदेकर घराण्यातील दोन्ही उमेदवारांनी अनपेक्षितरीत्या विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांना धोबीपछाड दिली आहे. मात्र, या विजयानंतर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलिसांनी विजयी मिरवणूक आणि जल्लोषावर तात्काळ बंदी घातली. पण आंदेकरांच्या घराजवळ जल्लोष पहायला मिळाला. वनराज आंदेकरच्या मुलीने यावेळी आनंद व्यक्त केला.
वनराजच्या लेकीला आनंद गगनात मावेना
प्रभाग 23 मधून दोन्ही आंदेकर विजयी झाले असून यामध्ये प्रभाग 23-ब मध्ये वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर तर प्रभाग क्रमांक 23-क मधून वनराजची चुलती लक्ष्मी आंदेकर यांचा देखील विजय झाला आहे. दोघी सध्या तुरूंगात असल्याने आता तुरूंगात देखील गुलाल उधळला गेला आहे. आई विजयी झाल्यानंतर वनराजच्या लेकीला आनंद गगनात मावेना झाला.
advertisement
काय म्हणाली वनराजची मुलगी?
मी तर सर्वात आधी जनतेला खूप खूप धन्यवाद म्हणेल. कारण जनतेनेच आम्हाला निवडून दिलं. नेहमी सत्याचाच विजय होतो, हे सर्वांनी आम्हाला देखील पटवून दिलंय. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवलाय. माझ्या आईला तुम्ही विश्वास दाखवला. आम्ही हा विश्वास सार्थ ठरवू. आम्ही वचन दिलेली काम पूर्ण करू, असं वनराज आंदेकरच्या मुलीने म्हटलं आहे.
advertisement
लक्ष्मी आंदेकरला 9833 मतं
लक्ष्मी आंदेकरने प्रभाग क्रमांक 23 (क) मधून विजय मिळवला आहे. भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून लक्ष्मी आंदेकरने दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादीकडून लक्ष्मी आंदेकरला तिकीट देण्यात आलं होतं. भाजपच्या ऋतूजा गडाळे यांना 9752 मतं मिळाली असून लक्ष्मी आंदेकरला 9833 मतं मिळाली. यामध्ये लक्ष्मी आंदेकरचा फक्त 81 मतांनी विजय झाला. सासूनंतर आता सुनेचा देखील विजय झाल्याने आनंद व्यक्त केला जातोय.
advertisement
कधी कोणता त्रास झाला नाही
दरम्यान, आमच्या इथं खूप चांगलं काम आंदेकरांनी केलं आहे. कधी काही गडबड झाली तरी सर्व काही व्यवस्थित होतं. त्यामुळे आम्हाला कधी कोणता त्रास झाला नाही. त्यामुळे जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला, असं स्थानिक नागरिकांनी म्हटलं आहे. अशातच आता आंदेकर परिवार पुन्हा चर्चेत आलं आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 9:17 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Andekar : 'माझ्या आईला तुम्ही...' तुरूंगात असलेल्या सोनालीचा विजय, वनराजच्या मुलीचा आनंद गगनात मावेना! म्हणाली 'सत्याचाच विजय होतो...'









