अनुष्का नाही तर या व्यक्तीसोबत विराटनं घेतलं महाकालचं दर्शन, पहाटे भस्म आरतीचा घेतला अनुभव पाहा VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
भारत विरुद्ध न्यूझीलंड वन डे सीरिज निर्णायक टप्प्यावर आहे. विराट कोहली, कुलदीप यादव, टी. दिलीप आणि टीम इंडियाने उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेतले.
भारत विरुद्ध न्यूझीलंड तीन सामन्याची वन डे सीरिज सुरू आहे. ही सीरिज आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. न्यूझीलंड आणि भारताने प्रत्येकी एक एक सामना जिंकला आहे. शेवटच्या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. इंदूरच्या मैदानात रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, नेहमी अनुष्का शर्मासोबत दिसणारा विराट कोहली यावेळी टीम इंडियाच्या एका 'खास' व्यक्तीसोबत भस्म आरतीला उपस्थित होता.
विराटसोबत नक्की होतं तरी कोण?
शनिवारी पहाटे झालेल्या भस्म आरतीमध्ये विराट कोहलीसोबत गोलंदाज कुलदीप यादव आणि टीम इंडियाचे फील्डिंग कोच टी. दिलीप दिसून आले. अनुष्का शर्मा यावेळी सोबत नव्हती, मात्र विराट पूर्णपणे भक्तीत तल्लीन झालेला दिसला. जवळपास दोन तास विराटने भस्म आरतीचा अनुभव घेतला. कपाळावर भस्म आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेला विराटचा 'भक्त' अवतार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे.
advertisement
गंभीर अन् राहुलनेही टेकवलं डोकं
केवळ विराटच नाही, तर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनीही महाकालाचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत केएल राहुल आणि संघातील इतर सदस्यांनीही बाबा महाकालाचा आशीर्वाद घेतला. मालिकेचा शेवटचा सामना इंदूरमध्ये असल्याने खेळाडूंनी शेजारीच असलेल्या उज्जैनला भेट देण्याची संधी सोडली नाही.
VIRAT KOHLI AT THE SHRI MAHAKALESHWAR TEMPLE IN UJJAIN. pic.twitter.com/S6kbCRCf7h
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 17, 2026
advertisement
कुलदीपला वर्ल्ड कपचा विश्वास
दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना कुलदीप यादव भावूक झाला होता. तो म्हणाला, "महाकालाच्या दर्शनाने खूप शांतता मिळाली. संपूर्ण टीम इथे आली होती. आगामी टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया नक्कीच दमदार कामगिरी करेल." रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दल बोलताना तो म्हणाला की, हे दोन्ही क्रिकेटचे दिग्गज आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमुळे संघात एक वेगळीच ऊर्जा मिळते.
advertisement
Virat Kohli visited the Shri Mahakaleshwar Temple to seek blessings#ViratKohli #Mahakaleshwar pic.twitter.com/l1LDrYIerk
— Rahul Yadav (@RahulYadav61762) January 17, 2026
नेहमी कॅमेऱ्यासमोर असणाऱ्या विराटने आज स्वतः कॅमेरा हातात घेतला होता. दर्शनानंतर मंदिराच्या प्रांगणात बसलेला असताना विराटने महाकालेश्वर मंदिराचे काही फोटो आपल्या मोबाईलमध्ये टिपले. नंदीच्या मूर्तीजवळ बसून शांतपणे ध्यान करतानाचा त्याचा फोटो चाहत्यांच्या मनाला स्पर्श करून जात आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Madhya Pradesh
First Published :
Jan 17, 2026 9:17 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
अनुष्का नाही तर या व्यक्तीसोबत विराटनं घेतलं महाकालचं दर्शन, पहाटे भस्म आरतीचा घेतला अनुभव पाहा VIDEO









