Viral Video : चालत्या बाईकवर 'मुलींचा रोमान्स', भरधाव गाडीवर केलं किस अन् मारली मिठी
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
आजकाल तरुण तरुणी प्रेमात एवढे आकंठ बुडालेले असतात की त्यांना बाकी कशाचं भानच राहत नाही. प्रेमयुगुल खुलेआम प्रेम व्यक्त करताना दिसतात.
नवी दिल्ली, 02 ऑगस्ट : आजकाल तरुण तरुणी प्रेमात एवढे आकंठ बुडालेले असतात की त्यांना बाकी कशाचं भानच राहत नाही. प्रेमयुगुल खुलेआम प्रेम व्यक्त करताना दिसतात. अनेकदा आपलं प्रेम खुलेआम दाखवत स्टंटही करतात. तुम्ही आत्तापर्यंत तरुण तरुणींना गाडीवर रोमान्स करताना पाहिलं असेल. अशा घटना अनेक ठिकाणांवरुन समोर आल्या आहेत. सध्या दोन मुलींचा रोमान्स समोर आला आहे तोही भरधाव गाडीवर.
मुला मुलींचा गाडीवर मिठी मारताना, किस करतानाचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. आता दोन मुलीचा किस करताना व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली आहे.
व्हिडिओमध्ये बाईकवर दोन मुली एकमेकांसमोर बसलेल्या दिसत आहेत. गाडी भरधाव वेगाने धावत आहे. मुली एकमेंकींना किस करतात मग मिठी मारतात. रस्त्याने जाण्याऱ्या कोणातरी हा व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याविषयी स्पष्टता नाहीये.
advertisement
advertisement
ghantaa नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहे. मात्र गाडीच्या रजिस्ट्रेशन प्लेटवरून तो तामिळनाडूचा असल्याचा अंदाज लावला जात आहे.
दरम्यान, आजची तरुण पिढी गाडीवर निरनिराळे स्टंट करताना दिसतात. आता स्टंटसोबत रोमान्सही करताना दिसतात. विविध शहरातून असे व्हिडीओ समोर येत असतात. दिवसेंदिवस असे प्रकार अधिक समोर येत आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 02, 2023 1:00 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Viral Video : चालत्या बाईकवर 'मुलींचा रोमान्स', भरधाव गाडीवर केलं किस अन् मारली मिठी







