Viral Video : मॉलमध्ये शॉपिंगला गेली व्यक्ती, कॅश काऊंटवर जवळ काढली लुंगी अन्....
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
जगभरात निरनिराळ्या प्रकारचे लोक आहेत. यापैकी काही जुगाडू लोक आहेत. ते कशापासून काय जुगाड करतील कोणीच अंदाज लावू शकत नाही.
नवी दिल्ली, 02 ऑगस्ट : जगभरात निरनिराळ्या प्रकारचे लोक आहेत. यापैकी काही जुगाडू लोक आहेत. ते कशापासून काय जुगाड करतील कोणीच अंदाज लावू शकत नाही. असे देशी जुगाडू लोकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच गराळा घालताना दिसतात. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती लुंगी घालून मॉलमध्ये गेली आणि पुढे घडलं भलतंच.
एका व्यक्तीने मॉलमधील सामान नेण्यासाठी लुंगीचा जुगाड केल्याचं पहायला मिळालं. तो मॉलमध्ये लुंगी घालून गेला आणि कॅश काऊंटवर गेल्यावर ती लुंगी काढली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाहीय.
advertisement
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती मॉलमध्ये सामान घेत आहे. विषेश म्हणजे तो लुंगी घालून मॉलमध्ये आला आहे. सामान घेतल्यानंतर तो कॅश काऊंटवर जाताना दिसत आहे. तिथे जाताच तो आपली लुंगी काढतो. त्यानं आत जीन्स घातली होती. लुंगी काढून तो त्यामध्ये खरेदी केलेलं सामान भरायला लागतो. हे पाहून कॅश काऊंटरवर असलेली मुलगी पण हसू लागते. इतर लोकही त्याच्याकडे पाहू लागतात. तो मस्त सगळं सामान लुंगीत भरून घेऊन जातो.
advertisement
Power of Lungi !!!!!!!
pic.twitter.com/CF8AkvZHCZ— Hasna Zaroori Hai (@HasnaZarooriHai) August 1, 2023
@HasnaZarooriHai नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. 2 मिनिट 1 सेकंदाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक मजेशीर कमेंट येत आहेत.
advertisement
दरम्यान, असे मजेशीर, जुगाडू व्हिडीओ सोशल मीडियावर कायमत पहायला मिळतात. आपल्या कल्पनाच करु शकत नाही अशी गोष्टींपासून लोक जुगाड करतात. असे जुगाडू व्हिडीओही समोर येत असतात.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 02, 2023 10:47 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Viral Video : मॉलमध्ये शॉपिंगला गेली व्यक्ती, कॅश काऊंटवर जवळ काढली लुंगी अन्....








