RCB च्या माजी खेळाडूच्या पत्नीने महापालिका निवडणुकीत उधळला गुलाल, सासरा महाराष्ट्राचा मोठा नेता! पाहा कोण?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Jalna Mahanagar Palika Result 2026 : खोतकर कुटुंबातील माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची कन्या दर्शना झोल विजयी झाल्या. दर्शना झोल या भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आरसीबीचा माजी खेळाडू विजय झोल याच्या पत्नी आहे.
Darshana Zol Win in jalana : जालना महानगरपालिकेच्या पहिल्याच ऐतिहासिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विरोधकांचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता काबीज केली आहे. एकूण 65 जागांपैकी तब्बल 42 जागांवर विजय मिळवत भाजपने महापालिकेचा गड सर केला. या निवडणुकीत शिवसेनेला (शिंदे गट) 12, काँग्रेसला 8, एमआयएमला 2 तर एका अपक्षाला विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे, महायुतीचा भाग असूनही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार व शरद पवार गट) आणि मनसेची पाटी कोरीच राहिली. अशातच आरसीबीच्या माजी खेळाडूच्या पत्नीचा या निवडणुकीत विजय झाला आहे.
अर्जुन खोतकर यांची कन्या विजयी
खोतकर कुटुंबातील माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची कन्या दर्शना झोल विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 16 मधून त्या निवडून आल्या. दर्शना झोल या भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आरसीबीचा माजी खेळाडू विजय झोल याच्या पत्नी आहे. 2012 मध्ये आशिया कप संपल्यानंतर, ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आलेल्या 2012 आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कपसाठी त्याला भारतीय टीमचा व्हाइस-कॅप्टन नियुक्त करण्यात आलं होतं. या वर्ल्ड कपमध्ये त्याने टीमसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
advertisement
काँग्रेसचा गड ढासळला
जालना महापालिका निवडणुकीत एमआयएमने 2 जागा जिंकत महापालिकेत प्रवेश केला आहे. एकूण 7 मुस्लिम उमेदवार निवडून आले असून त्यात काँग्रेसचे 3, एमआयएमचे 3, शिवसेनेचा 1 आणि भाजपच्या एका मुस्लिम उमेदवाराचा समावेश आहे. जालन्याला महानगर पालिकेचा दर्जा मिळाल्यापासून ही पहिलीच निवडणूक होती. पहिल्याच निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत भाजपनं विजय खेचून आणला. कधी काळी जालना हा काँग्रेसचा गड मानला जात होता. पण यंदा हा गड ढासळला आहे. जालन्यात भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे.
advertisement
एमआयएमने बाजी मारली
जालना महानगर पालिकेत भाजपनं 65 पैकी 41 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याने इथला पहिला महापौर हा भाजपचा होणार आहे. भाजपनंतर इथं शिवसेना शिंदे गटाचे 12 नगर सेवक निवडून आले आहेत. तर काँग्रेसला केवळ 9 जागांवर विजय मिळवता आला. दोन जागांवर एमआयएमने बाजी मारली आहे. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 11:12 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
RCB च्या माजी खेळाडूच्या पत्नीने महापालिका निवडणुकीत उधळला गुलाल, सासरा महाराष्ट्राचा मोठा नेता! पाहा कोण?










