दोन उंदरांची रस्त्यावर जुंपली, दे दणादण लाथाबुक्क्यांच्या भांडणाचा असा Video तुम्ही कधी पाहिलाच नसणार

Last Updated:

व्हिडिओमध्ये दिसतं की रस्त्याच्या मध्यभागी दोन उंदीर जोरदार भांडण करतायत. इतकंच नाही, तर बाजूने वाहनेही जातायत पण हे दोघं चक्क रस्त्यावरच झुंजतायत.

व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
मुंबई : कोणतीही एखादी घटना घडली की लोक त्याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर करतात, जो क्षणात व्हायरल होतो. क्षणात सोशल मीडियावर व्हायरल होते. कधी लोकांच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होतो, तर कधी प्राण्यांच्या मजेदार कृत्यांचा. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे, ज्यात दोन उंदरांच्या भांडणामुळे रस्त्यावरील ये जा करणारे लोक आश्चर्यचकीत झाले.
व्हिडिओमध्ये दिसतं की रस्त्याच्या मध्यभागी दोन उंदीर जोरदार भांडण करतायत. इतकंच नाही, तर बाजूने वाहनेही जातायत पण हे दोघं चक्क रस्त्यावरच झुंजतायत. त्यांना थांबवण्यासाठी एक व्यक्ती येतो आणि त्यांना रागावतो. तो हात उगारून त्यांना घाबरवतो आणि शेवटी ते उंदीर शांत होतात. हे दृश्य पाहताना खरोखरंच आश्चर्यचकीत करणारं आहे. उंदरांना असं भांडताना पाहाणं हे विश्वास न बसण्यासारखंच आहे.
advertisement
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर raja_pehlwan_ नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 12 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि जवळपास साडेनऊ लाखांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.



 










View this post on Instagram























 

A post shared by @raja_pehlwan_



advertisement
व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलं, "कोणी तरी पोलीस स्टेशनला कॉल करा." दुसऱ्याने मजेत लिहिलं, "साइडला भांडत बसा." तिसऱ्याने कमेंट केली, "हे प्रकरण जरा सिरियस वाटतंय." तर कुणी तर अंदाज बांधला की, "हे नक्की नवरा-बायको असतील, महाभारत सुरू आहे." आणखी एका यूजरने लिहिलं, "अशा लोकांवर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे, जे खुलेआम कायदा हातात घेतायत."
view comments
मराठी बातम्या/Viral/
दोन उंदरांची रस्त्यावर जुंपली, दे दणादण लाथाबुक्क्यांच्या भांडणाचा असा Video तुम्ही कधी पाहिलाच नसणार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement