advertisement

भारतीय रेल्वे ट्रेकवर का लिहिलं जातं सी/फा किंवा W/L? या अर्थ नेमका आहे तरी काय?

Last Updated:

आता हेच पाहा ना तुम्ही रेल्वे लाईनच्या बाजूला सी/फा आणि W/L लिहिलेले पाहिले असेल. पण हे का आणि कशासाठी लिहिलं जातं याबद्दल विचार केलाय? याचा नेमका अर्थ काय होतो? चला जाणून घेऊ.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : भारतीय रेल्वेचा प्रवास हा सर्वांच्या खिशाला परवडणारा असतो, ज्यामुळे बहुतांश लोक याने प्रवास करतात. लोक यामुळे वेळेवर आपल्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचतात. गरीब असोत किंवा श्रीमंत सर्वच लोक रेल्वेने वेगवेगळ्या श्रेणीतून प्रवास करतात. लोकांनी अनेकदा रेल्वेनं लांबचा प्रवास केला असेल. पण अनेकांनी याच्याशी संबंधीत गोष्टींची माहिती मिळवली नाही.
आता हेच पाहा ना तुम्ही रेल्वे लाईनच्या बाजूला सी/फा आणि W/L लिहिलेले पाहिले असेल. पण हे का आणि कशासाठी लिहिलं जातं याबद्दल विचार केलाय? याचा नेमका अर्थ काय होतो? चला जाणून घेऊ.
रेल्वेमध्ये अनेक साइन बोर्ड आहेत, त्यापैकी एक C/FA आणि W/L आहे. हे चिन्ह ट्रॅकच्या बाजूला पिवळ्या बोर्डवर लिहिलेले आहे. C/FA आणि W/L हे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचे साइनबोर्ड आहेत. गाडी त्या भागात पोहोचल्यावर ट्रेनच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजवलाच पाहिजे, असा हा साईन बोर्ड सूचित करतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे चिन्ह रेल्वे क्रॉसिंगसाठी शिट्ट्याचे सूचक आहे, याचा अर्थ शिट्टी वाजवा. याचा अर्थ, शिट्टी वाजवा, पुढे एक गेट आहे.
advertisement
हा साईन बोर्ड रेल्वे क्रॉसिंगपासून अंदाजे 250 मीटर अंतरावर करण्यात आला आहे. हे फलक पिवळ्या रंगाचे असल्याने ते सहज दिसतात.
रेल्वे रुळांपासून ते ट्रेनपर्यंत अशी अनेक चिन्हे आहेत जी महत्त्वाच्या माहितीने भरलेली आहेत. ज्याबद्दल बहुतेकांना माहिती नाही. पण अशी जाणून घेतलेली माहिती नेहमीच आपल्या ज्ञानात भर टाकते. जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी या चिन्हांबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. कारण त्यात अतिशय महत्त्वाची माहिती असते, जी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते.
view comments
मराठी बातम्या/Viral/
भारतीय रेल्वे ट्रेकवर का लिहिलं जातं सी/फा किंवा W/L? या अर्थ नेमका आहे तरी काय?
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement