साबण, टाॅवेल, लिपस्टिक... ही तरुणी वापरते सर्व काही 'सेकंड हँड', यामागचं कारण ऐकून व्हाल थक्क!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
शांघायची 26 वर्षीय सु यीझे ही कोणतीही नवी वस्तू खरेदी करत नाही. कपडे, फर्निचर, झाडे, अगदी लिपस्टिकही ती सेकंड-हँड वापरते. तिचे पालक पर्यावरणस्नेही होते, त्यामुळे लहानपणापासून तिला ही सवय लागली. ती कॅनडामध्ये...
जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोकं आहेत. काही लोकांना प्रत्येक गोष्ट नवीन हवी असते, तर काही लोकं इतरांनी वापरलेली कोणतीही वस्तू वापरतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मुलीची ओळख करून देणार आहोत, जिला स्वतःसाठी काहीही खरेदी करण्याची गरज नाही. ही मुलगी नेहमी स्वतःसाठी सेकंड हँड वस्तू म्हणजे इतरांनी वापरलेल्या वस्तू खरेदी करते.
26 वर्षांची ही मुलगी स्वतःसाठी कोणतीही वस्तू पहिल्यांदा खरेदी करत नाही, तर फक्त इतरांनी टाकून दिलेल्या वस्तू वापरते. काही गोष्टी इतक्या वैयक्तिक असतात की, त्या वापरण्यास तिला कोणतीही अडचण वाटत नाही. शांघायमध्ये राहणाऱ्या सु यिझेबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, जी लोकांचे टाकून दिलेले कपडे वापरण्यात आनंद मानते.
'इतरांचे कपडे वापरणं माझी सवय'
सु यिझे सांगते की, तिचे पालक पर्यावरणाबाबत खूप जागरूक होते आणि पाणी असो किंवा कोणतीही मोफत वस्तू असो, प्रत्येक वस्तू खूप विचारपूर्वक वापरायचे. सु म्हणते की, तिला सेकंड हँड कपडे, फर्निचर, झाडं आणि अगदी लिपस्टिकही आवडते. ती कंपोस्ट बनवण्यासाठी स्वयंपाकघरातील कचरा देखील वापरते. पूर्वी तिला इतरांचे टॉवेल वापरण्यास अडचण येत होती, पण नंतर ती तिची सवय बनली. ती म्हणते की, कॅनडामध्ये शिक्षण घेत असताना तिने काटकसर करायला शिकली, कारण तिला निसर्गावर प्रेम जडलं.
advertisement
सजीवांबद्दल तिच्या मनात खूप दया
सु म्हणते की, ती कॅनडामध्ये जिथे राहायची, तिथे लोकं पर्यावरणाचा खूप विचार करायचे. तिथे राहत असताना तिने चॅरिटी दुकानांमधून सेकंड हँड वस्तू खरेदी करायला सुरुवात केली. ती पूर्णपणे शाकाहारी झाली आहे आणि सजीवांबद्दल तिच्या मनात खूप दया आहे. ती टेकअवे घेत नाही किंवा पॅकेज केलेले अन्न आणत नाही. त्याऐवजी, ती ताजे आणि आरोग्यदायी अन्न खाते. ती आता लोकांना याबद्दल जागरूक करते. तिची कहाणी जाणून घेतल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिलं की, हे खूप जास्त आहे, तर काही लोकांनी तिला धाडसी म्हटलं.
advertisement
हे ही वाचा : शहरी जीवनाला वैतागलं कपल, फ्लॅट विकला अन् खरेदी केलं अख्खं गाव, जनावरं पाळून आहेत समाधानी!
हे ही वाचा : प्राध्यापकाच्या प्रेमात पडली गर्लफ्रेंड, 15 पानांची बाॅयफ्रेंडने दिली PPT अन् सर्वांसमोर उघड केलं सिक्रेट!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 06, 2025 5:50 PM IST
मराठी बातम्या/Viral/
साबण, टाॅवेल, लिपस्टिक... ही तरुणी वापरते सर्व काही 'सेकंड हँड', यामागचं कारण ऐकून व्हाल थक्क!