प्राध्यापकाच्या प्रेमात पडली गर्लफ्रेंड, 15 पानांची बाॅयफ्रेंडने दिली PPT अन् सर्वांसमोर उघड केलं सिक्रेट!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
चीनमधील नानजिंग नॉर्मल विद्यापीठात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीचे आपल्या मार्गदर्शक प्राध्यापकासोबत प्रेमसंबंध असल्याचे तिच्या प्रियकराने उघड केले. विद्यार्थिनीने प्राध्यापकाला ‘पिग्गी’ असे संबोधत होते, आणि...
प्रेमाला खरं तर वय नसतं. कोणत्याही वयात व्यक्ती कोणाच्याही प्रेमात पडू शकते, पण जेव्हा ते प्रतिष्ठेच्या विरोधात जातं, तेव्हा समस्या निर्माण होते. शेजारील देश चीनमध्ये असंच काहीसं घडलं, जेव्हा एका विद्यार्थिनीचं तिच्याच शिक्षकासोबत अफेअर सुरू झालं. तिला आधीपासूनच बॉयफ्रेंड होता, ज्याने दोघांमधील हे नातं उघड केलं.
जेव्हा बॉयफ्रेंडला वाटलं की त्याची गर्लफ्रेंड त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि त्याच्यावर नाराज आहे, तेव्हा त्याने प्रकरणाची चौकशी केली. मुलगी आणि शिक्षकाचं चॅट वाचल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. मुलगी जिआंग्सू प्रांतातील नानजिंग नॉर्मल युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडीची विद्यार्थिनी आहे आणि तिचं तिच्या मार्गदर्शकासोबत अफेअर सुरू होतं.
'पिग्गी प्रोफेसर'
ज्या प्राध्यापकासोबत विद्यार्थिनीचं अफेअर सुरू होतं, ते पर्यावरण विभागाचे उप-डीन आहेत आणि त्यांचं वय 46 वर्षं आहे. मुलीचा बॉयफ्रेंड सांगतो की, जेव्हा त्याला वाटलं की त्याची गर्लफ्रेंड त्याच्यासोबत डेटवर येऊ इच्छित नाही, तेव्हा त्याने तपास सुरू केला. त्याला समजलं की त्याची गर्लफ्रेंड तिच्या प्राध्यापकासोबत एका हॉटेलच्या खोलीत होती. प्राध्यापक तिला एका तरुण मुलाशी लग्न करण्याचा सल्ला देत होते, तर मुलगी म्हणाली की ती फक्त त्यांच्यावर प्रेम करते. मुलाने त्याच्या 14 पानांच्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं आहे की, त्याची गर्लफ्रेंड तिच्या प्राध्यापकाला प्रेमाने 'पिग्गी' म्हणायची. प्राध्यापकांनी तिला सर्व चॅट्स डिलीट करण्यासही सांगितलं होतं, पण मुलीने तसं केलं नाही, ज्यामुळे तिच्या बॉयफ्रेंडला सर्व पुरावे मिळाले.
advertisement
बॉयफ्रेंडने केला पर्दाफाश
बॉयफ्रेंडने लिहिलं आहे की, जेव्हा त्याला समजलं की त्याची गर्लफ्रेंड या घाणेरड्या नात्यात आहे, तेव्हा त्याचं मन आधी सुन्न झालं आणि नंतर त्याने जगासमोर सत्य उघड केलं. तो म्हणतो की, कोणीही पुन्हा मुलीच्या जाळ्यात अडकू नये, म्हणून त्याने ही कहाणी उघड केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्राध्यापकांचं पद काढून घेण्यात आलं आहे आणि त्यांना निलंबितही करण्यात आलं आहे. हे पहिलंच प्रकरण नाही, गेल्या वर्षी एका मुलीने तिच्या बॉयफ्रेंडसोबत 300 मुलींचे संबंध 58 पानांच्या फाईलद्वारे उघड केले होते.
advertisement
हे ही वाचा :शहरी जीवनाला वैतागलं कपल, फ्लॅट विकला अन् खरेदी केलं अख्खं गाव, जनावरं पाळून आहेत समाधानी!
हे ही वाचा : वाजत-गाजत येणार होती वरात, नवऱ्याच्या हाती पडलं पत्रक, त्यानं ठोकली धूम, पुढे नवरी रडतच...
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 06, 2025 5:31 PM IST
मराठी बातम्या/Viral/
प्राध्यापकाच्या प्रेमात पडली गर्लफ्रेंड, 15 पानांची बाॅयफ्रेंडने दिली PPT अन् सर्वांसमोर उघड केलं सिक्रेट!