'कितने आदमी थें?' एका बाईकवर 8 तरुणांचा प्रवास आणि... वारंवार पाहिला जातोय Video
- Published by:Devika Shinde
Last Updated:
बाईकवर जरी दोन प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी असली तरी देखील गल्ली गोळ्यात एका बाईकवरुन तुम्ही 3 किंवा कधी 4 लोकांना प्रवास करताना पाहिलं असेल.
मुंबई : बाईक असोत किंवा कार, बस सगळ्यांच गाड्यांचे ट्राफिक नियम असतात. ज्यामध्ये सिटबेल्ट लावणे, हेल्मेट घालणे, टूरिस्ट गाड्यांचं परमीट, इत्यादीं नियम आहेत. ज्यामध्ये गाड्यांचे पेपर्स, PUC सारख्या गोष्टी ही आहेत. ज्याचं पालण करणं सगळ्यांसाठी गरजेचं आहे.
एवढच नाही तर या वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशीच्या संख्यांचे देखील नियम आहेत. ज्यामध्ये बाईकवर एक प्रवासी आणि ड्रायवर अशा दोघांना परवानगी आहे. तर 7 सिटर किंवा 4 सिटर गाड्यांमध्ये ड्रायवर पकडून अनुक्रमे 8 किंवा 5 जणांना प्रवाशाची परवानगी आहे. बसला देखील त्याच्या सिटिंग कॅपेसीटीनुसार प्रवाशांना नेण्याची परवानगी आहे. त्यामुळे हा नियम तोडला तर त्या वाहानावर आणि त्याच्या मालकावर फाइन बसतं.
advertisement
हे नियम आपल्या आणि इतरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बरोबर देखील आहे. पण सगळे जण हे नियम पाळत नाहीत. आता बाईकचच घ्या ना. बाईकवर जरी दोन प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी असली तरी देखील गल्ली गोळ्यात एका बाईकवरुन तुम्ही 3 किंवा कधी 4 लोकांना प्रवास करताना पाहिलं असेल.
मात्र, या वेळेस जे घडलं ते सगळ्याच मर्यादा ओलांडणारं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये एका बाईकवर तीन नाही, चार नाही, पाच नाही चक्क आठ जण बसून प्रवास करत होते.
advertisement
आता हा आकडा सांगितल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की कारमध्ये एवढे लोक बसवता येत नाहीत तर बाईकवर कसे बसवत असतील? शिवाय उत्सुकता देखील असेल की हे मुलं कुठे आणि कशी बसली असतील? मग आधी हा व्हिडीओ पाहा.
🚨 Shocking stunt on NH44!
A viral video shows 8 individuals dangerously riding a single motorcycle near Gagan Pahad, #Hyderabad. The risky act, caught on camera, has sparked outrage online. Netizens demand strict action.
pic.twitter.com/h4tgnNnzLB
— Backchod Indian (@IndianBackchod) June 24, 2025
advertisement
हा चकित करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की आठ तरुण एकाच बाईकवर सवार होऊन वेगात रस्त्यावरून जात आहेत. ना कुणी हेल्मेट घातलंय, ना कुणी सुरक्षिततेची तमा बाळगली आहे.
कुठे घडलं हे धक्कादायक प्रकरण?
ही घटना हैदराबादच्या आउटर रिंग रोड (ORR) परिसरातील सर्व्हिस रोडवर घडली. हा भाग नेहमीच वेगवान आणि जड वाहतुकीसाठी ओळखला जातो. व्हिडीओमध्ये दिसतंय की पाच तरुण थेट बाईकवर बसले आहेत, तर उरलेले तीनजण बाईकभोवती स्टंट करत आहेत.
advertisement
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रचंड प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी म्हटलं, "या तरुणांनी तर बाईकचं मिनी बसमध्ये रूपांतर केलं." तर कुणी चिंता व्यक्त करत लिहिलं, "एक छोटासा अपघात यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो." काहींनी तर त्यांच्या अक्कलशून्यपणावर थेट टीकाच केली आहे.
या धोकादायक स्टंटची माहिती ‘X’ (ट्विटर) वर दिल्यानंतर सायबराबाद सोशल मीडिया सेलने तात्काळ राजेंद्रनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेचच आठही तरुणांचा शोध घेऊन त्यांना RGIA पोलीस ठाण्यात नेलं. त्यांच्या विरोधात निष्काळजीपणे वाहन चालवणे, सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणे आणि वाहतूकीत अडथळा निर्माण करण्याचे गुन्हे दाखल केले आहेत.
advertisement
पोलीस विभागाकडून स्पष्ट सांगण्यात आलंय की अशा प्रकारचे स्टंट केवळ बेकायदेशीरच नाहीत, तर तुमचं आणि इतरांचं आयुष्य धोक्यात घालू शकतात. म्हणून कृपया अशा स्टंटपासून दूर राहा आणि वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 24, 2025 8:28 PM IST
मराठी बातम्या/Viral/
'कितने आदमी थें?' एका बाईकवर 8 तरुणांचा प्रवास आणि... वारंवार पाहिला जातोय Video