बाबो! फक्त गुटख्याचे डाग स्वच्छ करण्यासाठी रेल्वे खर्च करते तब्बल 1200 कोटी

Last Updated:

सार्वजनिक ठिकाणी थुंकणं आणि गुटखा खाऊन थुंकणं या दोन्ही वाईट सवयी आहेत. त्यामुळे रोगप्रसार तर होतोच; पण ते स्वच्छ करण्यासाठी येणारा खर्च किती आहे हे जाणून घेतलं, तर धक्काच बसेल.

भारतीय रेल्वे
भारतीय रेल्वे
नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये देशात स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणावर राबवलं जाऊ लागलं आहे. जनजागृतीसाठीही मोठा खर्च केला जातो आणि कार्यक्रमही मोठ्या प्रमाणावर केले जातात. त्याचा परिणामही काही प्रमाणात दिसतो आहे; मात्र काही नागरिकांना असलेल्या वाईट सवयी मात्र जाता जात नाहीत. त्याचं एक मोठं उदाहरण म्हणजे गुटखा खाणं आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणं.
गुटखा खाणं ही एक वाईट सवय आहे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणं आणि गुटखा खाऊन थुंकणं या दोन्ही वाईट सवयी आहेत. त्यामुळे रोगप्रसार तर होतोच; पण ते स्वच्छ करण्यासाठी येणारा खर्च किती आहे हे जाणून घेतलं, तर धक्काच बसेल. पान-गुटखा खाऊन लोकांनी सार्वजनिक ठिकाणी केलेली अस्वच्छता काढून टाकण्यासाठी भारतीय रेल्वेला दर वर्षी सुमारे 1200 कोटी रुपये खर्च येतो, असा एक अंदाज आहे. या समस्येशी दोन हात करण्यासाठी आता रेल्वेने एक नवीन नियोजन केलं आहे. त्याबद्दल अधिक जाणून घेऊ या.
advertisement
गुटखा खाल्ल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो, ही जोखीम सर्वांनाच माहिती आहे. त्याची जाणीव करून देण्यासाठी गुटख्याच्या पाकिटांवरही धोक्याचा इशारा छापला जातो. तरीही गुटखा खाण्याचं प्रमाण काही कमी होत नाही आणि तो खाऊन थुंकण्याचं प्रमाणही कमी होत नाही. त्याबद्दल जनजागृतीसाठीही मोठा खर्च केला जातो. तरीही समस्या कायमच आहे. म्हणूनच रेल्वेने आता यावर मात करण्यासाठी एक नवा उपाय आणला आहे.
advertisement
या नव्या योजनेनुसार रेल्वे स्टेशनच्या परिसरात स्पिटर किऑस्क लावले जातील. त्यांचा उपयोग नागरिक करू शकतील. देशभरातल्या 42 स्टेशन्सवर असे किऑस्क रेल्वेकडून लावले जाणार आहेत. त्या किऑस्कमध्ये थुंकण्यासाठी स्पिटून पाउच उपलब्ध असतील. त्यांची किंमत पाच ते दहा रुपयांच्या दरम्यान असेल. नागरिकांनी थुंकण्यासाठी या स्पिटून पाउचचा वापर केला, तर डाग पडणार नाहीत. साहजिकच डाग साफ करण्यासाठीच्या खर्चात घट होऊ शकेल, असा रेल्वेचा अंदाज आहे. यासाठी नागरिकांना किरकोळ का होईना, पण पैसे खर्च करावे लागणार असल्याने त्या योजनेला किती प्रतिसाद मिळतो, हे पाहावं लागेल.
advertisement
व्यक्तिगत पातळीवर स्वच्छता किती महत्त्वाची आहे, याचा अनुभव कोविड-19च्या साथीच्या काळात साऱ्या जगाने घेतला आहे. तरीही वाईट सवयींचे गुलाम असलेल्यांची संख्या आजही मोठी आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकांसह सर्व सार्वजनिक ठिकाणी खूप अस्वच्छता दिसते. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागल्यास हे खर्च कमी होऊ शकतील आणि देश आरोग्यसंपन्न होईल.
view comments
मराठी बातम्या/Viral/
बाबो! फक्त गुटख्याचे डाग स्वच्छ करण्यासाठी रेल्वे खर्च करते तब्बल 1200 कोटी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement