Stunt Video: ड्रायव्हिंग सीट सोडून कारवर चढली व्यक्ती, उभं राहून केली स्टंटबाजी

Last Updated:

सोशल मीडियाची क्रेझ लोकांना काय काय करायला लावते. लोक प्रसिद्धीसाठी आणि चर्चेत राहण्यासाठी आजकाल सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ बनवतात.

ड्रायव्हिंग सीट सोडून कारवर चढली व्यक्ती
ड्रायव्हिंग सीट सोडून कारवर चढली व्यक्ती
नवी दिल्ली : सोशल मीडियाची क्रेझ लोकांना काय काय करायला लावते. लोक प्रसिद्धीसाठी आणि चर्चेत राहण्यासाठी आजकाल सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ बनवतात. अनेकदा तर लोक आपला जीवही धोक्यात टाकायला कमी करत नाही. असे अनेक व्हिडीओ सतत इंटरनेटवर फिरत असतात. असाच एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये एक व्यक्ती ड्रायव्हिंग सीटवरुन कारच्या वर जाऊन बसतो. ही स्टंटबाजी पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.
चालू गाडीवर स्टंटबाजी करतानाचा व्यक्तीचा व्हिडीओ समोर आलाय. व्हिडीओ बनवण्याच्या नादात त्यानं आपला जीवही धोक्यात टाकलाय. चालू गाडीत तो ड्रायव्हिंग सीटवरुन उठून थेट कारवर चढतो आणि उभा राहतो. हे दृश्य खूप भयानक आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, व्यक्ती हायवेवर गाडीची ड्रायव्हिंग सीट सोडून वर चढतो. गाडीवर उभा राहून तो स्टंटबाजी करतोय. मागून कोणीतरी व्यक्तीचा व्हिडीओ शूट करत आहे. गाडीचा तोल गेला असता तर मोठा अपघात घडू शकत होता. अशी स्टंटबाजी करणाऱ्यांवर लोक संताप व्यक्त करत आहे.
advertisement
हायवेवर व्यक्तीची स्टंटबाजी जीवघेणीही ठरु शकली असते. गाडीच्या नंबरवर असलेल्या नंबरवरुन हा व्हिडीओ राजस्थानमधील झालावाडचा असल्याचं समजतंय. व्हिडीओ व्हायरल होताच व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहे. अशा घटनांमध्ये होणारी वाढ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Stunt Video: ड्रायव्हिंग सीट सोडून कारवर चढली व्यक्ती, उभं राहून केली स्टंटबाजी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement