मुंबईच्या तरुणानं घरच्या घरीच तयार केलं टेलिस्कोप, काय होती नेमकी प्रोसेस? VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Pratikesh Patil
Last Updated:
telescope made at home - प्रथमेश सुर्वे असे या तरुणाचे नाव आहे. त्याला लहानपणापासून टेलिस्कोपमधून आणि चंद्र आणि तारे जवळून बघून त्यावर अभ्यास करण्याची आवड होती. मात्र, टेलिस्कोप महाग असल्याने त्यालाही तो परवडणारा नव्हता. मग त्याने टेलिस्कोप कशाप्रकारे असते याची माहिती घेऊन सर्व साहित्य जमा केले.
प्रतिकेश पाटील, प्रतिनिधी
मुंबई - खूप लोकांना टेलिस्कोपमधून चंद्र, सूर्य, तारे जवळून बघावेसे वाटते. मात्र, त्यासाठी लागणारे टेलिस्कोप खूप महाग असल्याने ते सर्वसामान्य परवडत नाही. पण मुंबईतील एका तरुणाने स्वत:च टेलिस्कोप बनवला आहे. याचबाबत लोकल18 चा हा स्पेशल रिपोर्ट.
प्रथमेश सुर्वे असे या तरुणाचे नाव आहे. त्याला लहानपणापासून टेलिस्कोपमधून आणि चंद्र आणि तारे जवळून बघून त्यावर अभ्यास करण्याची आवड होती. मात्र, टेलिस्कोप महाग असल्याने त्यालाही तो परवडणारा नव्हता. मग त्याने टेलिस्कोप कशाप्रकारे असते याची माहिती घेऊन सर्व साहित्य जमा केले.
advertisement
हे साहित्य जमा केल्यावर एक वर्ष टेलिस्कोप बनवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एक वर्षानंतर छोटा टेलिस्कोप बनवून तयार झाला. त्यांनतर प्रथमेशने अजून एक मोठा टेलिस्कोप बनवला आहे. टेलिस्कोप बनण्यासाठी महत्त्वाचे भाग असतात. त्या लेन्स बॅलेन्स प्रथमेशला पाहिजे त्याप्रमाणे त्या माणसाकडून बनवून घेतो. त्याचप्रमाणे हे टेलिस्कोप बनवण्यासाठी त्या पीव्हीसी पाईपमध्ये असणारे अंतर महत्त्वाचा आहे. त्याला फोकल लेंथ म्हणतात. त्यामध्ये कॅल्क्युलेशन अगदी बरोबर लागते. त्यानुसार, प्रथमेशने टेलिस्कोप बनवला आहे.
advertisement
हे टेलिस्कोप बनण्यासाठी लेन्स सर्वात प्रथम महत्त्वाचे आहे. ती तुम्हाला बनवून भेटते. त्यानंतर टेलिस्कोपची पूर्ण बॉडी ही पीव्हीसी पाईपापासून बनवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे डबल टेपचा वापर करुन या पीव्हीसी पाईपच्या आत डबल लेन्सच वापर करण्यात आला आहे. त्याचे कॅल्क्युलेशन बरोबर नसेल तर आपल्याला या दुर्बिणीतून चंद्र बरोबर दिसणार नाही.
advertisement
खर्च किती आला -
हा टेलिस्कोप बनण्यासाठी प्रथमेशला जवळपास साडे तीन हजार रुपये खर्च आला आहे. बाजारात गेल्यावर टेलिस्कोप 20 हजारच्या वर मिळतो. पण प्रथमेशने हा टेलिस्कोप स्वतःच घरच्या घरी पण 3500 पर्यंत हा टेलिस्कोप बनवला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2024 6:55 PM IST
मराठी बातम्या/Viral/
मुंबईच्या तरुणानं घरच्या घरीच तयार केलं टेलिस्कोप, काय होती नेमकी प्रोसेस? VIDEO