Do You Know : भारतातील 'या' मंदिरात देवाला चढवली जाते प्राण्याची बळी, लोकांमध्ये वाटला जातो मांसाचा प्रसाद
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हे ऐकायला तुम्हाला थोडंसं विचित्र वाटत असेल, शिवाय हे वादग्रस्त विधान देखील आहे. पण हे खरं आहे.
मुंबई : लवकरच श्रावण महिना सुरु होणार आहे. या महिन्यात बहुतांश लोक हे नॉनवेज किंवा मांसाहार करत नाहीत. शिवाय मंदिरात जाताना देवाची पुजा करताना लोक उपवास करतात किंवा देवाला शाकाहारी पदार्थ बनवून नैवेद्य दाखवतात. मंदिराच्या आजूबाजूच्या भागात मांसाहार पदार्थ विकण्यावर बंदी असते. पण तुम्हाला माहितीय का की असं एक मंदिर आहे, जिथे चक्क देवालाच मांसाहाराचा भोग चढवला जातो.
हे ऐकायला तुम्हाला थोडंसं विचित्र वाटत असेल, शिवाय हे वादग्रस्त विधान देखील आहे. पण हे खरं आहे.
पण भारतासारख्या विविधतेनं नटलेल्या देशात, जिथं प्रत्येक काही किलोमीटरवर भाषा, पेहराव आणि खानपान बदलतं, तिथं धार्मिक परंपराही वेगळ्याच स्वरूपात आढळतात. त्यामुळेच, अनेकांना आश्चर्य वाटेल पण भारतात काही असेही मंदिर आहेत जिथं देवतांना मांसाहारी अन्न म्हणजेच चिकन, मटण किंवा माशांचाही प्रसाद दाखवला जातो आणि तो भक्तही श्रद्धेने स्वीकारतात.
advertisement
कामाख्या देवी मंदिर (आसाम) हे मंदिर 51 शक्तीपीठांपैकी एक असून तंत्र विद्येचं केंद्र मानलं जातं. येथे माता कामाख्येला मांस आणि माश्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर तोच प्रसाद म्हणून वितरित होतो.
कालीघाट मंदिर (कोलकाता) येथेही बकऱ्याचा बळी दिला जातो आणि त्यानंतर बकऱ्याचं मांस प्रसाद म्हणून भक्तांना वाटलं जातं.
मुनियांदी स्वामी मंदिर (मदुरई, तमिळनाडू) येथे तर प्रसाद म्हणून मटण आणि चिकन बिर्याणी चढवली जाते. हे मंदिर विशेषतः स्थानिक समाजात लोकप्रिय आहे.
advertisement
तरकुलहा देवी मंदिर (गोरखपूर, उत्तर प्रदेश) येथे भक्त आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यावर बकऱ्याचा बळी देतात. त्यानंतर मंदिरातच मिट्टीच्या भांड्यात हे मांस शिजवून प्रसाद स्वरूपात दिलं जातं.
काही मंदिरांमध्ये आजही प्राचीन बलिप्रथा अस्तित्वात असून ती त्यांच्या धार्मिक संस्कृतीचा भाग मानली जाते.
मग कायदा का थांबत नाही?
भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या धार्मिक श्रद्धेनुसार पूजा करण्याचा आणि स्वतःच्या इच्छेप्रमाणे अन्न सेवन करण्याचा हक्क आहे. त्यामुळे कायदेशीररीत्या प्रचलित जनावरांच्या बलिप्रथांवर थेट बंदी घालता येत नाही.
advertisement
आजच्या आधुनिक युगातही अशा परंपरा टिकून राहिल्या आहेत आणि त्या स्थानिक श्रद्धा, परंपरा व आस्था यांचं प्रतीक मानल्या जातात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 14, 2025 3:59 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Do You Know : भारतातील 'या' मंदिरात देवाला चढवली जाते प्राण्याची बळी, लोकांमध्ये वाटला जातो मांसाचा प्रसाद