advertisement

जगातला सर्वात सुरक्षित देश, पोलिसांनाही बंदुकीचा वापर करावा लागत नाही!

Last Updated:

जगभरात वेगवेगळे देश आहेत ज्याची आपली काही खास वैशिष्ट्य आहेत. प्रत्येक देशाचं काही ना काही वेगळेपण असतंच जे चर्चेचा विषय ठरतं. असाच एक देश आहे जो सुरक्षिततेसाठी ओळखला जातो. या ठिकाणी पोलीसही बंदुक बाळगत नाहीत.

जगातला सर्वात सुरक्षित देश
जगातला सर्वात सुरक्षित देश
नवी दिल्ली: जगभरात वेगवेगळे देश आहेत ज्याची आपली काही खास वैशिष्ट्य आहेत. प्रत्येक देशाचं काही ना काही वेगळेपण असतंच जे चर्चेचा विषय ठरतं. असाच एक देश आहे जो सुरक्षिततेसाठी ओळखला जातो. या ठिकाणी पोलीसही बंदुक बाळगत नाहीत. या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला कोणताही धोका वाटणार नाही. या ठिकाणी तुम्ही शांततेत आयुष्य जगू शकता. हा देश कोणता आहे आणि या देशाची काय खासियत आहे पाहुया.
जगातील सुरक्षित वाटणारा देश आइसलॅंड आहे. हा नॉर्डिंक देश असून यूरोपचा भाग मानला जातो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Quora वर कोणीतरी विचारलं की जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण कोणतं आहे जिथे गुन्हेगारीची पातळी सर्वात कमी आहे? यावर काही लोकांनी उत्तरे दिली आहेत. अनेकांनी आइसलँडचेच नाव घेतलं.
advertisement
पॉप्युलेशन रिव्ह्यू आणि बिझनेस इनसाइडर वेबसाइटनुसार, आइसलँड हा जगातील सर्वात सुरक्षित देश मानला जातो. जागतिक शांतता निर्देशांकानेही या देशाला प्रथम क्रमांकाचा दर्जा दिला आहे. नॅशनल जिओग्राफिकच्या मते या देशाचा 11 टक्के भाग बर्फाने झाकलेला आहे. ग्लोबल वॉर्मिंग वाढत राहिल्यास हा देश लवकरच बुडेल. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आइसलँडची सार्वजनिक विद्यापीठे शिक्षण शुल्क आकारत नाहीत, ते फक्त विद्यार्थ्यांकडून अर्ज आणि नोंदणी शुल्क आकारतात.
advertisement
दरम्यान, गुन्ह्याबद्दल बोलायचं तर इथे इतकी शांतता आहे की पोलिसांना बळाचा वापर करावा लागत नाही. त्यामुळेच पोलिसांकडे बंदुका नसून ते फक्त मिरचीचा फवारा आणि लाठीमार करण्यावर विश्वास ठेवतात. या देशात समलिंगी विवाहाला परवानगी असून, स्त्री-पुरुषांना समान वेतन देण्याची तरतूद आहे. या देशात लोकसंख्या देखील खूप कमी आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
जगातला सर्वात सुरक्षित देश, पोलिसांनाही बंदुकीचा वापर करावा लागत नाही!
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement