Mahua Moitra Pinaki Misra Wedding : भारताच्या खासदारांचं जर्मनीत थाटात लग्न, तिथं लग्नासाठी किती खर्च? आकडा वाचून थक्क व्हाल
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mahua Moitra Pinaki Misra Marriage : महुआ मोईत्रा ज्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. बीजेडी नेते पिनाकी मिश्रा यांच्याशी त्यांनी लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नवी दिल्ली : बरेच लोक डेस्टिनेशन वेडिंग करतात. भारतातील खासदारांनीही चक्क जर्मनीत लग्न केलं आहे. महुआ मोईत्रा ज्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. बीजेडीचे माजी खासदार पिनाकी मिश्रा यांच्याशी त्यांनी लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता प्रश्न पडतो की जर्मनीमध्ये लग्न करण्यासाठी किती खर्च येतो?
दोन वेळा लोकसभा खासदार राहिलेल्या तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांनी गुपचूप लग्न केलं आहे. द टेलिग्राफमधील वृत्तानुसार, त्यांनी 3 मे रोजी जर्मनीमध्ये बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रा यांच्याशी लग्न केलं. ते पुरी इथून लोकसभा खासदार राहिले आहेत. सूत्रानुसार त्यांनी जर्मनीमध्ये लग्न केलं आहे पण अद्याप कोणीही याबाबत अधिकृतरित्या सांगितलं नाही. पण त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.
advertisement
महुआ मोइत्रा आणि पिनाकी मिश्रा यांचं जर्मनीत लग्न झाल्यानंतर लोकांच्या मनात हा प्रश्न येणं स्वाभाविक आहे, की एक भारतीय जर्मनीमध्ये जाऊन लग्न कसं करू शकतो? आणि इथल्या लग्नाचा खर्च किती?
जर्मनीत लग्नासाठी किती खर्च?
खरं तर यासाठी जर्मनीकडून लग्नाच्या व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. या व्हिसामुळे त्यांना जर्मनीमध्ये प्रवेश करून लग्न करता येईल. जर कोणी आधीच विवाहित असेल तर त्यांना घटस्फोटाचा आदेश किंवा माजी पती/पत्नीचा मृत्यू प्रमाणपत्रदेखील आवश्यक आहे.
advertisement
एका जर्मन न्यूज पोर्टलनुसार, 2024 मध्ये सरासरी जर्मन लग्नात 15452.50 युरो म्हणजे तब्बल 15 लाख रुपये खर्च होता. 2024 मध्ये 2023 च्या तुलनेत लग्नामध्ये 8% जास्त खर्च दिसून आला आहे. जर्मनीमध्ये किमान 22.5 जोडपी असा खर्च करतात. प्रत्येक 8 जोडप्यांपैकी फक्त एक जोडपी त्यांच्या लग्नावर 5000 युरो म्हणजे 5 लाखांपेक्षा कमी खर्च करतात. त्याचवेळी 50 पैकी एक जोडपं असं आहे जे 40000 युरोपेक्षा जास्त म्हणजे जवळपास 40 लाख रुपये खर्च करतं.
advertisement
आता लग्न म्हटलं की लग्नाचे कपडे, सजावट, पत्रिका, जेवण, संगीत, फोटो इत्यादींवर खूप खर्च होतो. जर्मनीबद्दल बोलायचं झालं तर लग्नात खाण्यापिण्याचं बजेट सुमारे 7803.50 युरो म्हणजे साडेसात लाख रुपये, संगीत आणि लग्नाच्या ड्रेसवर अनुक्रमे सरासरी 1357.25 युरो आणि 1358 युरो म्हणजे जवळपास 1 लाख 30 हजार रुपये, फोटोग्राफीसाठी सरासरी 1667 युरो म्हणजे दीड लाख रुपये, सजावटीवर सरासरी 740.50 युरो 70 हजार रुपये, कार्ड/इतर स्टेशनरीवर सुमारे 303 युरो म्हणजे 30 हजार रुपये खर्च आहे.
advertisement
आता महुआ मोइत्रा एक आघाडीची नेता आहे, म्हणून त्यांनी लग्नावरही खूप खर्च केला असेल. तो नेमका किती याबाबत अद्याप माहिती नाही.
Location :
Delhi
First Published :
June 05, 2025 3:45 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Mahua Moitra Pinaki Misra Wedding : भारताच्या खासदारांचं जर्मनीत थाटात लग्न, तिथं लग्नासाठी किती खर्च? आकडा वाचून थक्क व्हाल