Mahua Moitra : फायर ब्रँड खासदार महुआ मोइत्रांनी बांधली लग्नगाठ, पती आहे 2 मुलांचा बाप अन् माजी खासदार
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Mahua Moitra Wedding : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि फायर ब्रँड खासदार महुआ मोइत्रा यांनी वयाच्या 50 व्या वर्षी लग्नगाठ बांधली आहे. जर्मनीमध्ये त्यांनी गुपचूपपणे विवाह केला असल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि फायर ब्रँड खासदार महुआ मोइत्रा यांनी वयाच्या 50 व्या वर्षी लग्नगाठ बांधली आहे. जर्मनीमध्ये त्यांनी गुपचूपपणे विवाह केला असल्याची माहिती समोर आली आहे. महुआ मोइत्रा या बिजू जनता दलाचे माजी खासदार पिनाकी मिश्रा यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या आहेत. या दोघांचा लग्नानंतरचा फोटो समोर आला आहे.
'द टेलिग्राफ'ने दिलेल्या वृत्तानुसार, महुआ आणि पिनाकी यांनी जर्मनीमध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले आहे. महुआ यांच्या विवाहावर तृणमूल काँग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. महुआ या त्यांच्या राजकीय कारकिर्दीसोबत वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. महुआचे पूर्वी डॅनिश फायनान्सर लार्स ब्रॉर्सन यांच्याशी लग्न झाले होते, परंतु त्यांचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला.
advertisement

दुसऱ्यांदा खासदार झाल्या आहेत महुआ...
महुआ मोइत्रा ही खासदार म्हणून दुसऱ्यांदा काम करत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महुआ यांनी पश्चिम बंगालमधील कृष्णा नगर मतदारसंघातून निवडणूक लढवली. महुआने यांनी निवडणूक जिंकली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कल्याण चौबे यांचा पराभव केला. महुआ दुसऱ्यांदा त्याच मतदारसंघातून निवडून आल्या. यावेळी तिने भाजपच्या उमेदवार अमृता रॉय यांचा पराभव केला.
advertisement
महुआवर प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप
महुआ मोइत्रा यांचा पहिला कार्यकाळ बराच वादग्रस्त होता. त्यांच्यावर पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारल्याचा आरोप होता. महुआ 'कॅश फॉर क्वेरी' प्रकरणात अडकल्या. या आरोपानंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. महुआ यांच्यावर मित्र नियमांचे उल्लंघन करत हिरानंदानीसोबत संसद लॉगिन आयडी आणि पासवर्ड शेअर केल्याचाही आरोप होता.
advertisement
कोण आहेत पिनाकी मिश्रा?
बिजू जनता दलाचे नेते हे पुरीचे माजी खासदार आहेत. पिनाकीचे पहिले लग्न संगीता मिश्रा यांच्याशी झाले होते. पिनाकी आणि संगीता यांचे लग्न 16 जानेवारी 1984 रोजी झाले. त्यांना दोन मुले आहेत, पण आता पिनाकी महुआसोबत रिलेशनशिपमध्ये होते. अखेर त्यांनी जर्मनीत लग्नगाठ बांधली.
Location :
New Delhi,New Delhi,Delhi
First Published :
June 05, 2025 3:01 PM IST
मराठी बातम्या/देश/
Mahua Moitra : फायर ब्रँड खासदार महुआ मोइत्रांनी बांधली लग्नगाठ, पती आहे 2 मुलांचा बाप अन् माजी खासदार