दोस्त असावा तर असा! साधा भाजी विक्रेता, खिशात हजार रुपयेही नव्हते, पण मित्राला दिले एक कोटी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Vegetables seller borrow money from friend won lottery : ज्याच्या खिशात हजार रुपयेही नव्हते पण त्याने आपल्या मित्राला तब्बल एक कोटी रुपये दिले आहेत. कसे काय? इतर लोकांनाही सुरुवातीला ही अफवा वाटली, पण जेव्हा सत्य कळलं तेव्हा त्यांना धक्का बसला.
नवी दिल्ली : मैत्रीचं नातं, ज्यासारखं दुसरं कोणतंच नातं नाही. अगदी कुटुंबातील सदस्य, नातेवाईकही साथ सोडतील पण काहींची मैत्री इतकी घट्ट असते की ती कधीच तुटत नाही. सुख असो वा दुःख मित्रच कामी येतात. असेच दोन मित्र. त्यापैकी एक भाजीवाला. ज्याच्या खिशात हजार रुपयेही नव्हते पण त्याने आपल्या मित्राला तब्बल एक कोटी रुपये दिले आहेत.
राजस्थानमधील भटिंडा येथील कोटपुतली येथील हा भाजी विक्रेता, अमित सेहरा असं त्याचं नाव. त्याचा मित्र मुकेशसोबत तो पंजाबला गेला होता. ते भटिंडा इथं चहासाठी थांबले होते. त्यादरम्यान लॉटरीच्या तिकिटांबद्दल चर्चा सुरू झाली. मुकेशने सांगितलं त्याने अनेकदा लॉटरी काढली पण त्याला काही लागली नाही. त्याने अमितला त्याचं नशीब आजमवायला सांगितलं.
advertisement
पण अमितकडे पैसे नव्हते. त्याने मुकेशकडूनच 1 हजार रुपये उधार घेतले आणि दोन लॉटरी घेतल्या. एक त्याच्या नावाने आणि एक त्याच्या बायकोच्या नावाने. पंजाब सरकारची ही दिवाळी बम्पर लॉटरी. 31 ऑक्टोबर रोजी लॉटरीचा निकाल आला. अमितने लॉटरी जिंकली होती.
पण त्याचा मोबाईल फोन खराब होता. मुकेशने त्याच्याशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला पण तो करू शकला नाही. मग क्षणाचाही विलंब न करता मुकेश अमितच्या घरी केला आणि त्याने त्याला लॉटरी जिंकल्याची आनंदाची बातमी दिली. अमितला विश्वासच बसत नव्हता. नंतर त्याने लॉटरीच्या तिकिटांचे क्रमांक जुळवले आणि ते अगदी सारखेच होते. इतर लोकांनाही सुरुवातीला ही अफवा वाटली, पण जेव्हा सत्य कळलं तेव्हा त्यांना धक्का बसला.
advertisement
मुकेशने दिलेल्या पैशांमुळे अमितचं नशीबच फळफळलं होतं. त्याने 11 कोटी रुपयांचे बक्षीस जिंकलं. आपण 11 कोटी रुपये जिंकलो तर एक कोटी तुझ्या मुलीसाठी तुला देईन, असं वचन अमितने मुकेशला दिलं होतं आणि त्याने सांगितलं तसं केलं. आपलं वचन पूर्ण केलं. मुकेशने एक हजार दिले त्या बदल्यात अमितने त्याला 1 कोटी रुपये दिले.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 05, 2025 12:04 PM IST
मराठी बातम्या/Viral/
दोस्त असावा तर असा! साधा भाजी विक्रेता, खिशात हजार रुपयेही नव्हते, पण मित्राला दिले एक कोटी


