Rashtrapati Bhavan Wedding : राष्ट्रपती भवनात पहिल्यांदाच होणार लग्नसोहळा, या कपलचं होणार लग्न, हे आहेत तरी कोण?
- Published by:Priya Lad
Last Updated:
राष्ट्रपती भवन, केंद्र सरकारची इमारत. सरकारी ठिकाणी कधीच खासगी सोहळे किंवा कार्यक्रम होत नाही. पण आता चक्क राष्ट्रपती भवनात इतर कोणता कार्यक्रम नाही तर चक्क लग्नसोहळा होणार आहे. देशात पहिल्यांदाच असं घडणार आहे.
नवी दिल्ली : आजपर्यंत तुम्ही बरेच लग्नसोहळे पाहिले असतील. पूर्वी दारातच लग्न लावली जायची. नंतर वेडिंग किंवा मॅरेज हॉल आणि खुल्या जागेत लॉनमध्ये लग्न होऊ लागले. आता लोक डेस्टिनेशन वेडिंगही करतात. कुणी समुद्रकिनारी, कुणी गार्डनमध्ये तर कुणी एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी लग्नगाठ बांधतात. पण तुम्ही कधी राष्ट्रपती भवनात कुणाचं लग्न झाल्याचं ऐकलं तरी आहे का? देशात पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात लग्नसोहळा होणार आहे.
राष्ट्रपती भवन, केंद्र सरकारची इमारत. सरकारी ठिकाणी कधीच खासगी सोहळे किंवा कार्यक्रम होत नाही. पण आता चक्क राष्ट्रपती भवनात इतर कोणता कार्यक्रम नाही तर चक्क लग्नसोहळा होणार आहे. देशात पहिल्यांदाच असं घडणार आहे. 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती भवनाच्या मदर तेरेसा क्राऊन कॉम्प्लेक्समध्ये लग्नाचा कार्यक्रम होणार आहे. या वास्तूत प्रथमच वधू-वरांना सात फेरे घेण्याचा बहुमान मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. यावेळी वधू-वर पक्षातील काही निवडक लोकच उपस्थित राहतील.
advertisement
राष्ट्रपती भवनात कुणाचं होणार लग्न?
आता राष्ट्रपती भवनात लग्न म्हणजे नेमकं असं कुणाचं लग्न आहे, हे कपल आहे तरी कोण ज्यांच्यासाठी राष्ट्रपती भवनाचं लग्नमंडप होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. वधूचं नाव आहे पूनम गुप्ता तर वराचं नाव आहे अवनीश कुमार.
advertisement
कोण आहे पूनम गुप्ता आणि अवनीश कुमार?
पूनम गुप्ता गणित विषयात पदवीधर आणि इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवीधर आहेत. त्यांनी ग्वाल्हेरच्या जिवाजी विद्यापीठातून बीएडही केलं. त्या श्योपूरच्या जवाहर नवोदय विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. पूनम यांनी UPSC CAPF परीक्षा-2018 मध्ये 81 वा क्रमांक मिळवला आणि CRPF मध्ये असिस्टंट कमांडंट बनल्या. पूनम गुप्ता यांनी 2023 साली प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये CRPF च्या महिला तुकडीचं नेतृत्व केलं.
advertisement
त्यांचे वडील रघुवीर गुप्ता शिवपुरीच्या श्रीराम कॉलनीत राहतात. ते नवोदय विद्यालय मगरौणी येथे कार्यालयीन अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
राष्ट्रपती भवनात कपलचं लग्न का?
पूनम गुप्ता या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पीएसओ आहेत. तर ज्यांच्याशी त्यांचं लग्न होणार आहे ते अवनीश कुमार जम्मू-काश्मीरमध्ये तैनात सीआरपीएफचे डेप्युटी कमांडंट आहेत.
advertisement
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पूनम यांच्या सौम्य वागण्याने, मवाळ बोलण्याने आणि कर्तव्यनिष्ठेने प्रभावित आहेत. पूनम यांचं लग्न ठरल्याचं समजल्यानंतर त्यांनी राष्ट्रपती भवनातील मदर तेरेसा क्राउन कॉम्प्लेक्समध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. पूनम यांचं लग्न राष्ट्रपती भवनात होणार असल्याची माहिती मिळताच घरात आनंदाची लाट उसळली. बाहेर प्रसारमाध्यमांचा मेळा आहे. पण पूनम आणि त्यांचे कुटुंब या लग्नाबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. प्रोटोकॉलचा हवाला देत त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
Location :
Delhi
First Published :
February 01, 2025 12:12 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Rashtrapati Bhavan Wedding : राष्ट्रपती भवनात पहिल्यांदाच होणार लग्नसोहळा, या कपलचं होणार लग्न, हे आहेत तरी कोण?