Weight Loss Tips : दररोज रात्री करते 'ती' गोष्ट; महिलेनं सांगितलं वजन घटवण्याचं सीक्रेट

Last Updated:

महिलेने आवडते पदार्थ खाऊन 83 किलो वजन कमी केलं. आधी तिचं वजन 146 किलो होते. 83 किलो वजन कमी केल्यावर आता तिचे वजन 63 किलो आहे.

फोटो : सोशल मीडिया
फोटो : सोशल मीडिया
नवी दिल्ली : तुम्ही वाढत्या वजनाने त्रस्त असलेले अनेक लोक आजूबाजूला पाहिले असतील. वजन कमी करण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. अशाच एका महिलेने तिचे 83 किलो वजन कमी केलं आहे. मुख्य म्हणजे ती दिवसातून चार वेळा जेवायची, तरीही तिने वजन एवढं कमी केलं. अली रिडगली असे या महिलेचं नाव आहे. अलीने आपले आवडते पदार्थ खाऊन 83 किलो वजन कमी केलं. आधी तिचं वजन 146 किलो होते. 83 किलो वजन कमी केल्यावर आता तिचे वजन 63 किलो आहे. तिचे जुने फोटो पाहिल्यास ही अली आहे, असं वाटत नाही.
अलीची उंची पाच फूट सहा इंच आहे. 'मी नेहमी माझ्या मित्रांपेक्षा लठ्ठ होते. पण 2018 मध्ये माझं लग्न मोडल्यावर माझा कॉन्फिडन्स कमी झाला. त्यानंतर मी स्वतः वजन कमी करण्याचा प्रयत्न केला आणि मला थोडं यश आलं, पण पुन्हा माझं वजन वाढलं. मी सर्जरी व वजन कमी करणाऱ्या औषधांचा विचार केला. कारण मी वजन कमी करण्यासाठी काहीही करायला तयार होते. पण मला कळून चुकलं की वजन कमी करण्याचा इन्स्टंट उपाय कोणताच नाही. माझ्या तब्येतीमुळे मला हार्ट अटॅक येईल, अशी भीती वाटायची,' असं अली म्हणाली.
advertisement
'मग मी एक ग्रुप जॉइन केला. ते फिटनेसची माहिती द्यायचे. वजन कमी करण्यासाठी मी स्वतः जेवण तयार करू लागले आणि बाहेरचं खाणं बंद केलं. वजन जास्त असल्याने मी डान्स फिटनेस क्लास जॉइन केला आणि माझं वजन कमी होऊ लागलं. मी नाश्त्यात फळं, फॅट फ्री दही व ओट्स खायचे. लंचमध्ये पनीर व सॅलेड खायचे. संध्याकाळी एक प्रोटीन बार व एक ग्लास रेड वाईन प्यायचे. रात्री चिकन व सॅलेड खायचे,' अशी माहिती अलीने दिली.
advertisement
रेड वाईनमध्ये रेस्वेराट्रॉल व इतर अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, ते ब्लड शुगर कंट्रोल करतात. त्यामुळे वजन कमी होण्याची शक्यता वाढते. रेड वाईनच्या प्रभावाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया आहेत. प्राण्यांवरील रिसर्चनुसार रेड वाईनच्या सेवनाने वजन व फॅट कमी होते. मात्र याचे ठोस पुरावे नाहीत. याबद्दल रिसर्च सुरू आहेत.
मराठी बातम्या/Viral/
Weight Loss Tips : दररोज रात्री करते 'ती' गोष्ट; महिलेनं सांगितलं वजन घटवण्याचं सीक्रेट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement