Dmart मध्ये इतकं स्वस्त सामान कसं मिळतं? 'या' गोष्टी ग्राहकांना माहित असायलाच हव्यात
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कधी तुमच्या डोक्यात प्रश्न आला का की डीमार्ट हे सगळं लोकांना इतकं स्वस्त कसं देतं?
मुंबई : हल्ली बहुतेक लोक दररोज लागणाऱ्या वस्तूंसाठी डीमार्टमध्ये जातात. मग ते धान्य असो, साबण-शांपू असो, कपडे असोत किंवा घर सजावटीच्या वस्तू सगळं काही इथूनच घेतलं जातं. कारण काय? तर स्वस्त दर आणि चांगल्या ऑफर्स
पण कधी तुमच्या डोक्यात प्रश्न आला का की डीमार्ट हे सगळं लोकांना इतकं स्वस्त कसं देतं?
यामागे मोठं कारण आहे डीमार्टचे मालक राधाकिशन दमानी. आता ते कसं? तर फारसं शिक्षण न घेतलेले राधाकिशन दमानी यांनी वेगळाच बिझनेस मॉडल चालवला आहे. त्यांनी हुशारीने डीमार्टला भारतातला एक विश्वासार्ह ब्रँड बनवलं.
सुरुवातीला ते शेअर बाजारात मोठे गुंतवणूकदार होते. 1999 मध्ये त्यांनी व्यवसायात उतरायचं ठरवलं. त्यानंतर बोरवेलचा व्यवसाय केला, पण तिथेही अपयश आलं. तरी हार न मानता, 2002 मध्ये त्यांनी मुंबईत पहिलं डीमार्ट स्टोअर सुरू केलं आणि इथूनच यशाचा प्रवास सुरू झाला.
advertisement
डीमार्ट इतकं स्वस्त का? यामागे आहेत खास कारणं
स्वतःची जमीन: डीमार्ट भाड्याच्या जागेवर दुकान उघडत नाही. सगळी स्टोअर्स ही दमानी यांची स्वतःची आहेत. त्यामुळे भाड्याचा खर्च शून्य आणि याचा फायदा थेट ग्राहकांना होतो आणि ग्राहकांना कमी किमतीत वस्तू मिळतात.
वेळेत स्टॉक बदलणं: जुनं माल साठवत नाहीत. दर 30 दिवसांत सगळा माल फिरवतात. त्यामुळे नवीन आणि फ्रेश मालच तुम्हाला मिळतो.
advertisement
पुरवठादारांना डिमार्ट लगेच पैसे देतं त्यामुळे त्यांनाही सवलतीत माल द्यायला हरकत नसते आणि याचाच फायदा डीमार्ट आपल्याला ही देतो.
कधी मिळतं सगळ्यात स्वस्त सामान?
साधारणपणे आठवड्याच्या मध्यंतरी म्हणजे मंगळवार किंवा बुधवारला डीमार्टमध्ये गर्दी कमी असते आणि त्यावेळी अनेकदा चांगल्या ऑफर्स मिळतात. त्यामुळे शक्य झालं तर या दिवशी खरेदी करा.
आज जिथं डीमार्ट उघडतो, तिथल्या भागाचा विकास होतो. घराचे दर वाढतात, दुकानं वाढतात म्हणजे आर्थिक हालचाल वाढते. राधाकिशन दमानी यांच्या सध्या दिसणाऱ्या पण खूप प्रभावी बिझनेस पद्धतीमुळेच डीमार्ट हा आज प्रत्येक कुटुंबाच्या विश्वासाचा एक भाग बनलाय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jun 16, 2025 8:13 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Dmart मध्ये इतकं स्वस्त सामान कसं मिळतं? 'या' गोष्टी ग्राहकांना माहित असायलाच हव्यात






