इस्रायलच्या सुंदर तरुणी, मॉडलिंग, फिल्म नाही तर सैन्यात होतात भरती, कारणही शॉकिंग

Last Updated:

Israel girl becomes soldier : आजच्या जगात जिथं अनेक देश सैन्यात महिलांना भरती करण्यासाठी संघर्ष करत आहेत, तिथे इस्रायलमध्ये ही एक सामान्य गोष्ट आहे. जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांपैकी एक असलेल्या इस्रायलच्या सैन्यात महिलांचाही समावेश आहे. 

News18
News18
नवी दिल्ली : सुंदर तरुणी म्हटलं की शक्यतो बहुतेकांचा एअर हॉस्टेस, मॉडलिंग, फिल्म याकडे कल असतो. पण इस्राइल जिथल्या महिला सगळ्यात सुंदर मानल्या जातात. अशा देशातील महिला मात्र मॉडलिंग, फिल्म नाही तर सैन्यात भरती होतात. इतर देशात तुम्ही पाहाल तर सैन्यात बहुतेक पुरुषच दिसतील. मग सुंदर असूनही इस्राइलच्या महिला सैन्यात का जातात, यामागील कारणही धक्कादायक आहे. एका युझरने Quora वर हा प्रश्न विचारला आहे, ज्याला लोक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.
जगातील सर्वात शक्तिशाली आणि बलवान देशांपैकी एक असलेल्या इस्रायलच्या सैन्याला जगातील सर्वात धोकादायक आणि सक्षम सैन्यांपैकी एक मानलं जातं. इथं तुम्हाला फक्त पुरुषच नाही तर महिलादेखील अभिमानाने आपल्या देशाची सेवा करताना दिसतील. इस्रायली सैन्यात पुरुष आणि महिला दोघंही आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी आपले प्राण देण्यास तयार असतात. येथील महिला युद्धभूमीत पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून लढतात आणि कोणत्याही अडचणीला तोंड देण्यास तयार असतात.
advertisement
याचं थेट आणि धक्कादायक उत्तर म्हणजे देशाचा कायदा आहे.  इस्रायलच्या स्थापनेपूर्वी इस्रायल संरक्षण दलात (IDF) महिलांचं प्रतिनिधित्व केलं जाईल याची खात्री करण्यात आली होती. इस्रायलमध्ये प्रत्येक ज्यू नागरिकाला वयाची 18 वर्षे वय पूर्ण झाल्यावर सक्तीची लष्करी सेवा करावी लागते, मग तो मुलगा असो वा मुलगी. या प्रकरणात आवड किंवा नापसंतीचा प्रश्नच उद्भवत नाही. येथील प्रत्येक नागरिकाचं सैन्यात सामील होणं हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे, जे पूर्ण करणं आवश्यक आहे. इस्रायली सरकारचा असा विश्वास आहे की देशाच्या संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाचं योगदान आवश्यक आहे, मग तो पुरुष असो वा महिला.
advertisement
इस्रायली सरकारने महिलांना सैन्यात काम करण्यासाठी प्रत्येक सुविधा मिळावी याची खात्री केली आहे. त्यांना सैन्यात काम करण्यासाठी समान वेतन आणि इतर सुविधा देखील दिल्या जातात. इस्रायली महिला वयाच्या अठराव्या वर्षी सैन्यात सामील होतात. दोन वर्षांच्या प्रशिक्षण आणि कर्तव्यानंतरच त्या सैन्य सोडू शकतात.
advertisement
इस्रायलमधील महिलांना सैन्यात सामील होण्यासाठी अगदी लहानपणापासूनच प्रशिक्षण दिले जातं. त्या टँक, विमान आणि युद्धभूमीवर पुरुषांसोबत काम करतात. इतकंच नाही तर त्यांना सैन्यात उच्च पदांवरही नियुक्त केलं जातं. त्या सर्व प्रकारच्या हवामानात आणि सर्व प्रकारच्या परिस्थितीत लढण्यास तयार असतात. त्या केवळ बंदुकी चालवण्यातच पारंगत नसतात, तर संगणक, अभियांत्रिकी आणि इतर तांत्रिक गोष्टींमध्येही तज्ज्ञ असतात. सैन्य प्रशिक्षण घेतल्यानंतर येथील महिला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या देखील खूप मजबूत होतात. त्या कोणत्याही प्रकारच्या अडचणींना तोंड देण्यास तयार असतात.
advertisement
आजच्या जगात जिथं अनेक देश सैन्यात महिलांना भरती करण्यासाठी संघर्ष करत आहेत, तिथे इस्रायलमध्ये ही एक सामान्य गोष्ट आहे. इस्रायलच्या महिलांनी हे सिद्ध केलं आहे की त्या कोणापेक्षाही कमी नाहीत. देशाचं रक्षण करण्यासाठी त्या त्यांच्या कुटुंबापासून आणि मित्रांपासून दूर राहतात, परंतु त्यांना याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही. त्या अभिमानाने सांगतात की त्या इस्रायली सैनिक आहेत आणि त्यांना त्यांच्या देशाचा अभिमान आहे. त्या केवळ त्यांच्या देशाची सेवा करत नाहीत तर जगभरातील महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत.
view comments
मराठी बातम्या/Viral/
इस्रायलच्या सुंदर तरुणी, मॉडलिंग, फिल्म नाही तर सैन्यात होतात भरती, कारणही शॉकिंग
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement